BSNL vs Airtel | भारतामध्ये अनेक दूरसंचार कंपन्या आहेत. ज्याचा फायदा नागरिकांना वेळोवेळी होत असतो. BSNL ही ग्राहकांमध्ये अत्यंत स्वस्त आणि जास्त काळासाठी अनेक योजना घेऊन येत असतात. अशातच आता या कंपनीने ग्राहकांसाठी एक नवीन प्लॅन केला आहे. या प्लॅनमध्ये 107 रुपयांमध्ये 35 दिवसांची वैधता आहे . त्याचप्रमाणे एअरटेल देखील त्यांचा ग्राहकांसाठी नवीन प्लॅन घेऊन आली आहे. त्याची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.
BSNL 107 रुपयांचा प्रीपेड रिचार्ज प्लॅन | BSNL vs Airtel
BSNL च्या 107 रुपयांच्या प्लॅनची वैधता 35 दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना 3GB डेटा मिळतो. या प्लॅनची खासियत म्हणजे हा प्लॅन बीएसएनएलच्या सर्वात स्वस्त प्लॅनपैकी एक आहे. डेटा मर्यादा संपल्यानंतर, त्याची गती मर्यादा 40kbps पर्यंत कमी होते. हाप्लॅन एका महिन्यापेक्षा जास्त कालावधीची वैधता देतो. या प्लॅनमध्ये यूजर्सना 200 मिनिटांची मोफत व्हॉईस कॉल सेवा मिळेल. याशिवाय या प्लानमध्ये बीएसएनएल ट्यून्स सेवाही ३५ दिवसांसाठी उपलब्ध असेल.
जे लोक कमी पैशात सिम सक्रिय ठेवण्याचा प्लॅन शोधत आहेत त्यांच्यासाठी ही योजना उपयुक्त ठरेल. या प्लॅनमध्ये 200 मिनिटे कॉलिंग मोफत उपलब्ध आहे. हा प्लॅन तुमचे सिम ३५ दिवस सक्रिय ठेवेल. हे या योजनेचे वैशिष्ट्य आहे. जर तुम्ही कमी डेटासह स्वस्त प्लॅन शोधत असाल तर ही योजना तुम्हाला मदत करू शकते.
एअरटेल 35 दिवसांची वैधता प्लॅन | BSNL vs Airtel
एअरटेलच्या 35 दिवसांच्या वैधतेच्या प्लॅनची किंमत 289 रुपये आहे. जर तुम्ही बारकाईने पाहिले तर ही अतिशय स्वस्त आणि परवडणारी योजना आहे. Airtel आपल्या रु. 289 च्या प्लॅनमध्ये एसएमएस आणि अमर्यादित कॉलिंग सारख्या 35 दिवसांच्या वैधतेसह अनेक फायदे ऑफर करते. कंपनी या प्लॅनमध्ये 300 एसएमएस मोफत देते. ग्राहकांना 4GB डेटाही मिळत आहे. 289 रुपयांचा हा नवीन रिचार्ज प्लॅन अशा वापरकर्त्यांसाठी फायदेशीर ठरू शकतो ज्यांना कमी डेटाची आवश्यकता आहे.व