‘बसपा’ पुढील प्रत्येक निवडणूक स्वतंत्र लढवेल – मायावती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

लखनऊ प्रतिनिधी । लोकसभा निवडणुकीत अपेक्षित यश न मिळाल्यामुळे बहुजन समाजवादी पार्टी (बसपा) आणि समाजवादी पार्टी (सपा) यांच्यात अनेक दिवसांपासून एकमेकांवर पराभवाचे खापर फोडण्याचे प्रकार चालू असतांना आज बसपा सर्वेसर्वा मायावती यांनी सपा सोबत युती संपल्याचे अखेर  जाहिर केले.

यापुढिल सर्व छोट्या मोठ्या निवडणुका बसपा स्वबळावर लढणार असल्याचं मायावती यांनी  ट्विटच्या माध्यमातून जाहिर केले. ‘बुवा और भतीजा’  यांच्या बहुचर्चित गठबंधनाच्या तुटीचा निर्णय आज मायावती यांनी लखनौ येथे झालेल्या बैठकीत जाहीर केला. नरेंद्र मोदी आणि अमित शहा या जोडगोळीला शह देण्यासाठी हे दोन्ही विरोधी पक्ष एकत्र आले होते. 

२०१२-१७ मधील सपा सरकारचे बसपा व दलित विरोधी निर्णय, आरक्षण विरोधी काम व राज्यात ढासळलेली कायदा व सुव्यवस्था या सर्व गोष्टी देश हितासाठी बाजूला ठेवून आम्ही त्यांच्या सोबत युती केली होती, मात्र सध्याच्या परिस्थितीमध्ये त्यांचे युती वाढीसाठी योग्य सहकार्य ना मिळत नसल्यामुळे आम्हाला आज हा निर्णय घ्यावा लागत आहे.  

 

 

 

Leave a Comment