केंद्र सरकारच्या शेतकरी कायदे विरोधात सिल्लोड मध्ये बसपाची निदर्शने

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | केंद्र सरकार ने पारित केलेल्या शेतकरी कायदे विरोधात आज सिल्लोड येथील उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयासमोर बहुजन समाज पक्षाच्या वतीने निदर्शने करण्यात आली. यावेळी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी आंदोलकांनी केली

भाजपा सरकाने पारित केलेले शेतकरी कायदे, कामगार कायदे व पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस यांच्या दरात केलेली प्रचंड दरवाढ, त्यामुळे भारतीय नागरीक, शेतकरी, कामगार यांच्या जीवनावर मोठे परिणाम झाले असून हे सर्व कायदे रद्द करावेत अशी मागणी करीत इतर जनतेच्या विविध ज्वलंत प्रश्नावर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी व कार्यवाही होण्यासाठी सिल्लोड बहुजन समाज पक्षाच्या वतीने सिल्लोड येथील उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी यांच्या कार्यालयासमोर विविध मागण्यासाठी निदर्शने करण्यात आली.

यावेळी प्रदेश महासचिव पंडित बोर्डे, प्रदेश सचिव सचिन बनसोडे, प्रदेश सचिव जगदीश बेदवे, जिल्हाध्यक्ष समाधान जाधव, जिल्हा प्रभारी शेख अक्रम यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment