चीनमध्ये आता ब्युबॉनिक प्लेग! वेळेवर उपचार न मिळाल्यास होतो २४ तासात मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। चीनच्या उत्तरेतील एका शहरात ब्युबॉनिक प्लेगच्या एका रुग्णाची नोंद झाल्यानंतर आता सर्वांना सावधान राहण्यास सांगण्यात आले आहे. इनर मोंगोलियाच्या स्वायत्त प्रदेश, बयन्नुर मध्ये प्लेगच्या नियंत्रण आणि प्रतिबंधाच्या तिसऱ्यापातळीच्या इशारा देण्यात आला आहे. अशी माहिती तेथील पीपल या दैनिकाने ऑनलाईन दिली आहे. १ जुलै रोजी २ संशयित रुग्ण सापडले होते. त्यांची चाचणी घेतली असता हे दोन्ही रुग्णांची ब्युबॉनिक प्लेगची चाचणी सकारात्मक आल्याचे समोर आले आहे. एक २७ वर्षीय नागरिक आणि त्याचा १७ वर्षाचा भाऊ हे दोन रुग्ण सापडले आहेत.

या दोन्ही रुग्णांनी मार्मोट मांस खाल्ले होते म्हणून आता सर्वाना हे मांस खाऊ नये असे सांगण्यात आले आहे. हा प्राण्यांमुळे माणसाला होणारा रोग असून तो माणूस किंवा प्राण्यांद्वारे पसरू शकतो. हा आजार संक्रमित पिसूच्या चाव्यामुळे होतो. एखाद्या प्लेग झालेल्या मृत प्राण्याच्या शरीरातील द्रवामुळे देखील हा आजार पसरू शकतो. येरसीनिया पेस्टीज मुळे होणाऱ्या तीन प्लेगपैकी हा एक प्लेग आहे. बाकीच्या दोन प्लेगची नावे सेप्टीकेमिक प्लेग आणि न्यूमोनिक प्लेग अशी आहेत. हा आजार झाल्यास रुग्णाला तात्काळ रुग्णालयात दाखल करणे गरजेचे असते. वेळेवर उपचार न मिळाल्यास २४ तासात मृत्यू होऊ शकतो असे जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे.

शरीरातील मांडीच्या सांध्यात, हाताच्या बगलेत किंवा मानेतील लसीका नोड्स सुजणे, ज्या चिकनच्या अंड्याइतक्या मोठ्या असू शकतात अशी साधारण लक्षणे दिसून येतात. या लसीका कोमल अथवा उबदार असू शकतात. कधी थंडी, डोकेदुखी, थकवा, स्नायू दुखणे अशी लक्षणे दिसू शकतात. २०१० ते २०१५ च्या दरम्यान ब्युबॉनिक प्लेग च्या ३,२०० केसेस नोंदवल्या गेल्या आहेत त्यातील ५८४ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. १४ व्या शतकात या प्लेगमुळे आशिया, युरोप आणि आफ्रिकेतील बहुतांश लोकांचे प्राण घेतले होते. सुमारे ५० दशलक्ष लोकसंख्या मृत्युमुखी पडली होती.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment