बुद्ध पौर्णिमा कोरोना नियमावलीचे पालन करून झाली साजरी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ लेणी येथे 2265 वी जयंती साजरी झाली. बुद्ध अनुयायने ही जयंती कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शांततेत व कमी लोकसहभागात साजरी केली. तसेच जगाला समतेचा आणि शांततेचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध यांच्या विचारांचे महत्व या दिवशी भन्ते यांनी सांगितले. तसेच मागील वर्षांपासून बुद्ध जयंती ही कोरोनामुळे अशाच पद्धतीने साजरी केली जात आहे.

लॉकडाऊनमध्ये गत वर्षांपासून हीच परिस्थिती आहे. शासकीय आदेशाचे पालन करून सर्व नियम समोर ठेऊनच ही जयंती साजरी केली. या ठिकाणी भव्य दिव्य बुद्ध मूर्तीचे पूजन करण्यात आले बुद्ध विहार ही सजवण्यात आले. तथागत गौतम बुद्ध यांचे पंचशील तत्वे या ठिकाणी सांगण्यात आले.

दरवर्षी लांखोच्या संख्येने बुद्ध अनुयायी गर्दी करतात. पण कोरोनाच्या महामारीमुळे ही वेळ आली आहे. पण भन्ते बोलताना म्हणाले स्वतःचे आरोग्य धोक्यात न घालता घरातच ऑनलाईन पद्धतीने साजरी केली पाहिजे. अशा धार्मिक समारंभात नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात पण सध्या शासकीय नियम पाळून सर्वांनी घरातच राहून बुद्ध पौर्णिमा साजरी केली जात आहे.

Leave a Comment