Budget 2021-22: अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात केली घोषणा, आता गोल्ड एक्सचेंजचे रेग्युलेशन SEBI करणार

नवी दिल्ली । केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (FM Nirmala Sitharaman) यांनी संसदेत 2021-22 चा अर्थसंकल्प सादर करताना म्हटले आहे की,” सिक्युरिटीज मार्केट कोडमध्ये सेबी कायदा, ठेवीदार कायदा आणि शासकीय सिक्युरिटीज अ‍ॅक्टचा समावेश असेल.” अर्थमंत्र्यांनी असे म्हटले आहे की,” सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) सोने एक्सचेंजसाठी नियामक म्हणून काम करेल. त्यांनी सिक्युरिटीज मार्केट कोड सुरू करण्याचा प्रस्ताव दिला आहे.” त्यांनी पुढे स्पष्ट केले की, सिक्युरिटीज मार्केट कोडमध्ये सेबी अ‍ॅक्ट, डिपॉझिटरी अ‍ॅक्ट आणि सरकारी सिक्युरिटीज समाविष्ट असतील.

गुंतवणूकदारांची सनद लागू करण्याचा प्रस्ताव
त्या म्हणाल्या की, गुंतवणूकदारांच्या संरक्षणासाठी सर्व वित्तीय उत्पादनांमध्ये गुंतवणूकदारांचा हक्क म्हणून गुंतवणूकदारांची सनद (Investor Charter) लागू करण्याचा प्रस्ताव आहे. बजट 2021 मधील सेबी कायद्यात काही बदल झाले असल्याचे सीतारमण यांनी म्हटले आहे. अर्थमंत्री पुढे म्हणाल्या की,” वेगवेगळ्या वर्षांत राबविले गेलेले कायदे अधिनियम म्हणून पुढे आणले जातील. सेबी अ‍ॅक्ट 1992, सिक्योरिटी अ‍ॅक्ट, गव्हर्नमेंट सिक्योरिटी अ‍ॅक्ट 2007 आणि इतर कायद्यांची चर्चा आहे.

LIC चा IPO
याशिवाय अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात IPO संदर्भात मोठी घोषणा केली आहे. LIC मधील IPO विषयी निर्मला सीतारमण यांनी म्हटले आहे की,”या आर्थिक वर्षात एलआयसीचा आयपीओ आणला जाईल. यासह, सरकारने पुढच्या वर्षी अनेक पीएसयू कंपन्यांच्या निर्गुंतवणुकीची योजना देखील तयार केली आहे. त्यासाठी नवीन कायदे बनविण्यात येतील. महत्त्वाचे म्हणजे गेल्या अनेक दिवसांपासूनLIC चा IPO आणण्याची चर्चा होती. आज अर्थमंत्र्यांनी याबाबत मोठी घोषणा केली.

आयपीओमध्ये गुंतवणूकदारांचे हित
मागील वर्षी म्हणजेच 2020 मध्ये प्रत्येक IPO ला जबरदस्त प्रतिसाद मिळाला. यावर्षीदेखील आतापर्यंतच्या IPO ला चांगले सब्सक्रिप्शन मिळत असल्याचे दिसते. आता अधिक गुंतवणूकदार आयपीओ मार्केटमध्ये यावे अशी सेबीचीही इच्छा आहे. म्हणूनच ते आयपीओअंतर्गत बऱ्याच शेअर्सची किंमत कमी करण्याचा प्रयत्न करीत आहे. सेबीशी संबंधित तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, भांडवल बाजार नियामक एका लॉटअंतर्गत 7500 रुपयांच्या गुंतवणूक करण्याची परवानगी देऊ शकतो. सध्या ते 15 हजार रुपये आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

You might also like