Budget 2021: कोरोना लसीकरणासाठी केंद्रानं केली ३५ हजार कोटींची तरतूद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन सोमवारी १ फेब्रुवारी २०२१ रोजी संसदेत बजेट सादर करत आहेत. देशातील उद्योजक, नोकरदार आणि सामान्य जनतेला बजेटची उत्सुकता लागली आहे.

कोरोना संकटात या अर्थसंकल्पात आरोग्यासाठीची तरतूद मोठ्या प्रमाणात वाढवली आहे. कोरोना लसीकरणासाठी केंद्रानं तब्बल ३५ हजार कोटींची तरतूद केली.

याशिवाय आरोग्य सुविधांसाठी २ लाख २३ हजार कोटींची तरतूद केली आहे. आरोग्य सुविधांसाठीची तरतूद गेल्या वर्षीच्या तुलनेत यावेळी १३७ टक्क्यांनी वाढवली आहे.

आज भारतात दोन लस उपलब्ध आहेत आणि त्यांनी केवळ देशातील नागरिकांनाच नव्हे तर 100 किंवा त्याहून अधिक देशांच्या नागरिकांनाच संरक्षण दिले आहे. आणखी दोन लस देखील लवकरच मिळण्याची शक्यता असल्याचे  निर्मला सीतारमण यांनी सांगितले.

Leave a Comment