Budget 2021: अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा! ‘इनकम टॅक्स’ मधून ज्येष्ठ नागरिकांना पूर्णपणे सुट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन आज (१ फेब्रुवारी) संसदेत बजेट सादर करत आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी सकाळी 11 वाजता सर्वसाधारण अर्थसंकल्प लोकसभेत सादर करण्यास सुरुवात केली आहे.  यावेळी निर्मला सीतारामन यांनी आयकराबाबत मोठी घोषणा केली आहे.

७५ वर्षांपेक्षा अधिक वय असेलेले ज्येष्ठ नागरिक, ज्यांच्या उत्पन्नाचे साधन केवळ पेन्शन आहे अशा सर्वांना इथून पुढे आयकरातून सूट देण्याचा प्रस्ताव सरकारचा असल्याची घोषणा सीतारामन यांनी केली आहे.

याशिवाय अनिवासी भारतीयांनाही केंद्रानं मोठा दिलासा दिला आहे. अनिवासी भारतीयांना कर भरण्यात अडचण होती, परंतु आता त्यांना डबल टॅक्स सिस्टममधून सूट देण्यात आली आहे. टॅक्स ऑडिटची मर्यादा पाच कोटींवरुन १० कोटींवर करण्यात आली आहे.

करोनामुळे सरकारसमोर मोठं आर्थिक आव्हान असून ८० हजार कोटींच्या निधीची गरज असल्याचं निर्मला सीतारामन यांनी सांगितलं आहे. ८० हजार कोटींचा निधी जमा करण्यासाठी अनेक योजना असल्याची माहिती त्यांनी दिली. २०२० मध्ये रेकॉर्डब्रेक ६ कोटी ४८ लाख लोकांनी आयकर रिटर्न भरल्याची माहितीही निर्मला सीतारामन यांनी दिली आहे.

 

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’. 

Leave a Comment