हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत अर्थसंकल्प सादर केला. निर्मला सीतारामन यांचा हा चौथा तर मोदी सरकारचा १० वा अर्थसंकल्प आहे. सहकार क्षेत्राला मात्र दिलासा मिळाला आहे. सहकार क्षेत्राला भराव्या लागणाऱ्या टॅक्स मध्ये कपात करण्यात येणार आहे.
सहकार क्षेत्राला १८ टक्क्यांनुसार कर भरावा लागतो. तो १५ टक्क्यावंर आणण्यात आला आहे. को-ऑपरेटिव्ह सोसीयटी ज्यांचं उत्पन्न १ ते १० कोटी आहे त्यांचा कर १२ टक्क्यांपासून ७ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे. तर दुसरीकडे नोकरदार वर्गाला मात्र कोणताही दिलासा मिळाला नाही. जुनी कर रचनाच इथून पुढेही चालु राहील.
दरम्यान, मोबाईल फोन, चार्जर, कपडे तसेच कृषी उपकरणे स्वस्त होणार असल्याची घोषणा निर्मला सीतारामन यांनी केली आहे. चामड्याच्या वस्तूही स्वस्त होणार आहे.