नवी दिल्ली । देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थसंकल्पीय अधिवेशन सादर केला. बजेट मध्ये मध्यमवर्गीयांना दिलासा देण्याचा प्रयत्न सरकार कडून सुरूच आहे. त्याचाच भाग म्हणून मध्यम आणि लघु उद्योगांसाठी 2 लाख कोटींची तरतूद सरकार कडून करण्यात आला आहे.
पुढील 3 वर्षांत 400 वंदे भारत ट्रेन धावणार, 100 कार्गो टर्मिनल बांधणार: FM
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की,”पुढील तीन वर्षांत 400 नवीन वंदे भारत ट्रेन चालवल्या जातील. 100 PM गती शक्ती कार्गो टर्मिनल्स बांधले जातील आणि पुढील तीन वर्षात मेट्रो सिस्टीम तयार करण्यासाठी नाविन्यपूर्ण पद्धतींचा अवलंब केला जाईल.”
हा अर्थसंकल्प पुढील 25 वर्षांसाठी अर्थव्यवस्थेची ब्लू प्रिंट असेल: अर्थमंत्री
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की,”हा केंद्रीय अर्थसंकल्प पुढील वर्षासाठी म्हणजे पुढील वर्षांसाठी भारताच्या अर्थव्यवस्थेचा आधार तयार करेल आणि अर्थव्यवस्थेची ब्लू प्रिंट देईल. या माध्यमातून भारत स्वातंत्र्याच्या 75 वर्षापासून ते 100 वर्षांपर्यंतचा प्रवास करेल.”
पुढील 5 वर्षात 40 लाख नवीन रोजगार निर्माण होतील : अर्थमंत्री
आत्मनिर्भर भारत योजनेची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या उत्पादन लिंक्ड प्रोत्साहन योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. यामुळे 60 लाख नवीन रोजगार निर्माण होतील आणि पुढील 5 वर्षात 30 लाख कोटींची अतिरिक्त निर्मिती होईल.
कृषी क्ष्रेतासाठी काम करणाऱ्या स्टार्ट अप्सना नाबार्डच्या माध्यमातून मदत केली जाणार, ९ लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली आणली जाणार. उत्तम फळे आणि भाजीपाल्यासाठी केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारच्या मदतीने योजना लागू करणार आहे.