Budget 2023 : आता PF मधून पैसे काढल्यावर द्यावा लागणार कमी TDS, जाणून घ्या कोणाला होणार फायदा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Budget 2023 : आज 1 फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प सादर केला. ज्यामध्ये अर्थमंत्र्यांकडून नोकरदार वर्ग, व्यवसायापासून ते गरीब-शेतकरी आणि महिलांपर्यंतच्या लोकांसाठी अनेक घोषणा करण्यात आल्या. यामध्ये आता EPF मधून काढलेल्या रकमेवरील टीडीएस 30 टक्क्यांवरून 20 टक्क्यांपर्यंत केला गेला आहे.

10 Steps To Follow For Seamless PF Withdrawal

हे जाणून घ्या कि, जर खातेदाराने 5 वर्षांच्या आत पैसे काढले तर त्याला टीडीएस द्यावा लागतो. मात्र जर, 5 वर्षांनंतर कोणताही टीडीएस आकारला जात नाही. ज्या लोकांकडे टॅक्स पॅन कार्ड आहे त्यांना कमी टीडीएस भरावा लागतो. तसेच जर एखाद्याने आपले पॅनकार्ड EPFO च्या रेकॉर्डमध्ये अपडेट केले नसेल तर त्याला 30% पर्यंत टीडीएस द्यावा लागेल. जो आता 20 टक्के करण्यात आला आहे. Budget 2023

EPFO Board meet today: Key announcements to watch out for | Economy News |  Zee News

TDS कधी घेतला जातो ???

जर एखाद्याने EPFO ​​खाते उघडल्यानंतर 5 वर्षांच्या आत पैसे काढले तर त्याला TDS भरावा लागेल. तसेच जर 50,000 रुपयांच्यावर रक्कम काढली आणि त्याच्याकडे पॅन कार्ड असेल तर त्याला 10% टीडीएस द्यावा लागेल, मात्र जर पॅन कार्ड नसेल तर 30% टीडीएस कापला जाईल. Budget 2023

EPFO Tip: How to check EPF balance online as money set to flow into your PF  account | Tech News

PF मधून पैसे कधी काढता येतील ???

जर एखादा खातेदार 2 महिन्यांपासून बेरोजगार असेल तर त्याला PF मधून पूर्ण पैसे काढता येतील. याशिवाय रिटायरमेन्टनंतर किंवा वयाची 58 वर्षे पूर्ण झाल्यानंतरही पूर्ण पैसे काढता येतील. तसेच जर एखाद्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर अशा परिस्थितीत त्याने नॉमिनेशन केलेल्या व्यक्तीला पीएफ खात्यातून पैसे काढता येतील. याशिवाय इतरही अनेक कारणे आहेत ज्यांद्वारे पैसे काढता येतील मात्र त्यासाठी काही अटींचे पालन करावे लागेल. Budget 2023

What are the Capital Gains Tax Rules for Different Investments in India?

इन्कम टॅक्स भरणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी

यंदाच्या अर्थसंकल्पात इन्कम टॅक्स भरणाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आली आहे. कारण यावेळी नवीन टॅक्स सिस्टीम अंतर्गत, सरकारने टॅक्स स्लॅबमध्ये बदल करून 3 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त केले आहे. इतकेच नाही तर 7 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर प्रभावीपणे कोणताही टॅक्स द्यावा लागणार नाही. इतर टॅक्स स्लॅब देखील खाली आणले आहेत. अर्थमंत्र्यांच्या संसदीय भाषणानुसार, आता 9 लाख रुपयांपर्यंत पगार असलेल्या लोकांना 60,000 रुपयांऐवजी फक्त 45,000 रुपये टॅक्स भरावा लागेल. Budget 2023

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.epfindia.gov.in/

हे पण वाचा :
Railway Budget 2023 : रेल्वेसाठी 2.4 लाख कोटींचे बजट, 2013 च्या अर्थसंकल्पापेक्षा 9 पटींनी जास्त
Union Budget 2023 : करदात्यांना खुशखबर!! मोदी सरकारकडून नवी कररचना जाहीर
Union Budget 2023 : काय स्वस्त अन् काय महाग?? पहा एका Click वर
New Tax Slab vs Old Tax Slab : जुन्या अन् नवीन स्लॅबमध्ये काय फरक आहे??? किती उत्पन्नावर किती टॅक्स द्यावा लागेल ते पहा
Union Budget 2023 : पर्यटनसाठी खास तरतूद; स्वदेश दर्शन योजनेसह युनिटी मॉल बद्दल अर्थमंत्र्यांचे मोठे निर्णय