Budget 2024 : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज दिनांक 23 जुलै रोजी 2024-25 या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये शेतकरी ,महिला, पर्यटन, तरुणवर्गासाठी अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या. या अर्थसंकल्पात हौसिंग (Budget 2024) क्षेत्रासाठीही घोषणा करण्यात आल्या आहेत. ज्या अंतर्गत शहरी घरांसाठी 2 लाख कोटी रुपये उपलब्ध करून दिले जातील. यासोबतच शहरी गृहनिर्माण कामांसाठी परवडणाऱ्या दरात कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी व्याज अनुदान योजना प्रस्तावित करण्यात आली आहे.
पंतप्रधान आवास योजना (Budget 2024)
पीएम आवास योजनेची सध्याची अंतिम मुदत डिसेंबर 2024 पर्यंत आहे. उद्दिष्ट पूर्ण न झाल्याने सरकारने अंतरिम अर्थसंकल्पात ही योजना पाच वर्षांनी वाढवली होती. यावेळी प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण आणि शहरी भागात तीन कोटी अतिरिक्त घरांची घोषणा करण्यात आली आहे. पंतप्रधान आवास योजना (शहरी) 2.0 ची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. याअंतर्गत 10 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून एक कोटी गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांच्या घरांच्या गरजा पूर्ण केल्या जातील. यामध्ये पुढील पाच वर्षांत 2.2 लाख कोटी रुपयांच्या (Budget 2024) केंद्रीय मदतीचा समावेश असेल.
14 मोठी शहरे विकसित करण्यात येणार (Budget 2024)
2024 चा अर्थसंकल्प सादर करताना, अर्थमंत्री सीतारामन म्हणाल्या की, वाढीव उपलब्धतेसह कार्यक्षम आणि पारदर्शक भाड्याने घेतलेल्या घरांसाठी सरकार उपाययोजना करेल.यासोबतच सरकार 30 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या 14 मोठ्या शहरांचा विकास करणार आहे. यासोबतच सरकार सात क्षेत्रांमध्ये डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर ॲप्लिकेशन विकसित करणार आहे. ज्यामध्ये क्रेडिट आणि एमएसएमई सेवा वितरणाशी (Budget 2024) संबंधित क्षेत्रांचा समावेश करण्यात आला आहे.
उद्योग कामगारांसाठी भाड्याच्या घरांची योजना (Budget 2024)
यासोबतच अर्थसंकल्प 2024 मध्ये प्रधानमंत्री आवास योजनेवरही मोठा भर देण्यात आला आहे. याबाबत अर्थमंत्र्यांनी सांगितले की, पीएम आवास योजनेंतर्गत 3 कोटी अतिरिक्त घरे बांधली जातील. यासोबतच त्यांनी उद्योग कामगारांसाठी भाडेतत्त्वावरील गृहनिर्माण योजना (Budget 2024) जाहीर केली आहे, जी VGF द्वारे PPP मोडवर आधारित असेल. उद्योग कामगारांसाठी भाड्याच्या घरांमध्ये वसतिगृह प्रकारची निवास व्यवस्था असेल.