Budget 2025 : देशवासियांना दिलासा!! केंद्रीय अर्थसंकल्पात होणार मोठे बदल ?

Budget 2025
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Budget 2025– आगामी केंद्रीय अर्थसंकल्प 2025 ची तयारी सुरू असून, नोकरदार वर्ग आणि पेन्शनधारकांना मोठ्या करसवलतीची अपेक्षा आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन लवकरच हा अर्थसंकल्प सादर करणार आहेत, ज्यामध्ये पगारदारांना दिलासा देणारे अनेक मोठे बदल होऊ शकतात. यामध्ये मुख्यत: प्राप्तिकर स्लॅब, स्टँडर्ड डिडक्शन आणि कलम 80C तील वजावट मर्यादेचा समावेश होऊ शकतो. त्यामुळे या अर्थसंकल्पात अजून कोणते मोठे बदल होणार आहेत याची माहिती घेऊयात. तर चला याबद्दल सविस्तर माहिती पाहुयात.

स्लॅब 20 लाख रुपयांपर्यंत वाढविण्याची गरज –

सरकारने मागील काही वर्षांपासून नवीन करप्रणालीत सुधारणा केल्या असून, यंदा टॅक्स स्लॅबमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. सध्या 10 लाख रुपयांवरील उत्पन्नासाठी 30% कर आकारला जातो. तज्ज्ञांच्या मते, हा स्लॅब 20 लाख रुपयांपर्यंत वाढविण्याची गरज आहे, जेणेकरून महागाईशी सुसंगत टॅक्स रचना निर्माण होईल.

ज्येष्ठ नागरिकांना विशेष सवलती (Budget 2025)-

तज्ज्ञांनी 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र टॅक्स स्लॅब तयार करण्याची शिफारस केली आहे. सध्याच्या नव्या करप्रणालीत (Budget 2025) सर्वांना समान करप्रमाण लागू आहे. मात्र, ज्येष्ठ नागरिकांना अधिक सूट देऊन कमी करदर आकारल्यास त्यांना आर्थिक दिलासा मिळेल.

नोकरदारांना अधिक फायदा –

सध्या पगारदारांसाठी स्टँडर्ड डिडक्शन 50000 रुपये आहे. गेल्या वर्षी नव्या करप्रणालीत हे 75000 रुपये करण्यात आले होते. यंदा हे 1 लाख रुपयांपर्यंत वाढवण्याची शक्यता आहे, ज्यामुळे नोकरदारांना अधिक फायदा होईल.

कलम 80C करमाफी –

(Budget 2025) कलम 80C अंतर्गत सध्या 1.5 लाख रुपयांपर्यंत करमाफी मिळते. मात्र, तज्ज्ञांनी ही मर्यादा 3.5 लाख रुपयांपर्यंत वाढवण्याचा सल्ला दिला आहे. गृहकर्जाच्या व्याजावर स्वतंत्र वजावट देण्याचाही सरकार विचार करू शकते. तसेच सरकार व्यापार तूट नियंत्रित करण्यासाठी सोन्यावरील आयात शुल्क वाढवण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोन्याचे दर वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हे पण वाचा : शिक्षणमंत्री भुसेंची मोठी घोषणा ; केंद्रीय शाळांत ‘गर्जा महाराष्ट्र’ राज्यगीत बंधनकारक