हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Budget 5G Smartphones : सध्या देशभरात 5G सर्व्हिस सुरु झाली आहे. ज्यानंतर लोकं 5G नेटवर्क वापरण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र 5G सर्व्हिस वापरण्यासाठी आपल्याकडे 5G फोन असणे महत्वाचे आहे. तसेच, ज्यांच्याकडे 5G फोन नाही ते नवीन फोनच्या शोधात आहेत. सध्या बाजारात कंपन्यांनी 15,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीचे 5G स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. चला तर मग त्याविषयी जाणून घेउयात…
iQOO Z6 Lite 5G – यामध्ये Octacore प्रोसेसर सोबत 4 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटरनल स्टोरेज मिळेल. यामध्ये 6.58 इंच स्क्रीनचा डिस्प्ले मिळेल ज्याचा रिफ्रेश रेट 120 Hz असेल. तसेच यामध्ये 50 MP आणि 2 MP रिअर कॅमेरे असून फ्रंट कॅमेरा 8 MP चा आहे. 5,000 mAh ची बॅटरी असलेल्या या फोनची किंमत सुमारे 14,000 रुपये आहे. Budget 5G Smartphones
Lava Blaze 5G – यामध्ये Octacore प्रोसेसर सोबत 4 जीबी रॅम आणि 128 GB इंटरनल स्टोरेज मिळेल. या फोनचा डिस्प्ले 6.5 इंच आहे. याचा मागील कॅमेरा 50 MP चा तर फ्रंट कॅमेरा 8 MP चा आहे. 5,000 mAh ची बॅटरी असलेल्या या फोनची किंमत सुमारे 11,000 रुपये आहे. Budget 5G Smartphones
realme 9 5G – यामध्ये Octacore प्रोसेसर सोबत 4 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटरनल स्टोरेज मिळेल. यामध्ये 6.58 इंचाचा डिस्प्ले मिळेल ज्याचा रिफ्रेश रेट 90 Hz आहे. यामध्ये 3 रिअर कॅमेरे मिळतील. ज्यातील पहिला कॅमेरा 48 MP चा आणि बाकी दोन कॅमेरे 2-2 MP चे असतील. यासोबतच16 MP चा फ्रंट कॅमेरा देखील आहे. 5,000 mAh ची बॅटरी असलेल्या या फोनची किंमत 14775 रुपये आहे. Budget 5G Smartphones
Xiaomi Redmi Note 10T – यामध्ये Octacore प्रोसेसर सोबत 4 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटरनल स्टोरेज मिळेल. यामध्ये 6.5-इंच डिस्प्ले मिळेल, ज्याचा रीफ्रेश रेट 90 Hz आहे. 48 MP आणि 2-2 MP चे 2 इतर कॅमेरे मागील बाजूस उपलब्ध आहेत. फ्रंट कॅमेरा 8 MP चा आहे. 5,000 mAh ची बॅटरी असलेल्या या फोनची किंमत सुमारे 12,000 रुपये आहे. Budget 5G Smartphones
Samsung Galaxy M13 5G – यामध्ये 6.5-इंच डिस्प्ले मिळेल, ज्याचा रीफ्रेश रेट 90 Hz आहे. यामध्ये 2.2 GHz Octacore प्रोसेसरसोबत 4 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटरनल स्टोरेज मिळेल. यामध्ये 50 MP आणि मागील बाजूस 2 MP कॅमेरा मिळेल. त्याचा फ्रंट कॅमेरा देखील 50 MP चा आहे. 5,000 mAh ची बॅटरी असलेल्या या फोनची किंमत सुमारे 14000 रुपये आहे. Budget 5G Smartphones
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://buy.realme.com/in/goods/553
हे पण वाचा :
‘या’ सरकारी बँकेकडून Home Loan वरील व्याजदरात मिळत आहे सूट
Gold Price Today : दिवाळीनंतरही सोन्या-चांदीच्या दरातील घसरण सुरूच, नवीन दर पहा
Central Bank of India ने FD वरील व्याजदरात केले बदल, नवीन दर पहा
Credit Card चा अशा प्रकारे वापर करून मिळवा अनेक फायदे !!!
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात घसरण, आजचे दर तपासा