नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आजकाल देशात मोठ्या प्रमाणात तांत्रिक प्रगती होताना दिसत आहे. दूरसंचार क्षेत्रामध्ये 4G नंतर आता 5G ही देशात येण्याच्या तयारीत आहे. यामुळे इंटरनेटचा वेग वाढण्यासोबतच इतरदेखील फायदे आपल्याला मिळणार आहेत. केंद्र सरकारकडून 5G ची प्रायोगिक तत्वावर चाचणी करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे आता काही दिवसांत देशात हे तंत्रज्ञान लॉंच होण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेऊनच कित्येक मोबाईल कंपन्यांनी आधीपासूनच 5G ला सपोर्ट करणारे स्मार्टफोन बाजारात आणले आहेत. सुरुवातीला महाग असणारे 5G फोन्स आता मध्यमवर्गीयांनाही परवडतील अशा किंमतीमध्ये उपलब्ध आहेत. जर तुम्हीदेखील कमी बजेटमध्ये 5G सपोर्ट करणारे फोन्स घेत असाल तर 15 हजारांपेक्षा कमी किमतीत मिळणारे 5G स्मार्टफोन बाजारात उपलब्ध आहेत.
Realme 8 5G
या स्मार्टफोनची किंमत सामान्य माणसाच्या खिशाला परवडेल अशीच आहे. या फोनची किंमत 13,999 रुपये असून ग्राहकांना या किमतीत 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज असलेला रिअलमी 8 हा फोन मिळणार आहे. हा फोन सध्या सुपरसोनिक ब्लॅक आणि सुपरसोनिक ब्लू कलर या दोन ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. या फोनमध्ये अँड्रॉईड 11 बेस्ड Realme UI 2.0, 90Hz रिफ्रेश रेटसह 6.5-इंची फुल-HD (1,080×2,400 पिक्सल) डिस्प्ले, MediaTek Dimensity 700 प्रोसेसर, 48MP ट्रिपल कॅमेरा सेटअप, 16MP सेल्फी कॅमरा आणि 5,000mAh चा बॅटरी बॅकअप मिळणार आहे.
Poco M3 Pro 5G
पोकोच्या या फोनची किंमत देखील रिअलमी इतकीच आहे. या फोनची किंमत 13,999 असलेल्या या फोनमध्ये 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज आहे. हा फोन कूल ब्लू, पॉवर ब्लॅक आणि पोको येलो या कलरमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये अँड्रॉईड 11 बेस्ड MIUI 12, 90Hz रिफ्रेश रेटससह 6.5-इंची फुल-HD होल पंच डिस्प्ले, MediaTek Dimensity 700 प्रोसेसर, Mali-G57 GPU, 48MP ट्रिपल कॅमेरा सेटअप, 8MP सेल्फी कॅमेरा आणि 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.
Oppo A53s 5G
या स्मार्टफोनची किंमत आधीच्या दोन फोनपेक्षा जास्त आहे. याबरोबर रॅम आणि स्टोरेज देखील जास्त आहे. या फोनची किंमत 14,990 रुपये आहे. या फोनमध्ये 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज देण्यात आले आहे. हा फोन क्रिस्टल ब्लू आणि इंक ब्लॅक कलरमध्ये उपलब्ध आहे. या फोनमध्ये अँड्रॉईड 11 बेस्ड ColorOS 11.1, 6.52-इंची HD (720×1,600 पिक्सल) डिस्प्ले, MediaTek Dimensity 700 प्रोसेसर, 13MP प्रायमरी कॅमेरा, 8MP सेल्फी कॅमेरा आणि 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.