हॅलो महाराष्ट्र। शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी सरकार प्रयन्त करत आहे. विमा योजनेतून शेतकऱ्यांना लाभ मिळतो आहे. असंही निर्मला सीतारामन यांनी जाहीर केलं. प्रधानमंत्री किसान योजनेद्वारे शेतकऱ्यांपर्यंत पैसे पोहचवण्यात यश आलं आहे. आपल्या देशातल्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर मदत करावी लागेल त्यासाठी आम्ही सज्ज आहोत असंही निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केलं. शेतकऱ्यांसाठी आम्ही 16 कलमी कार्यक्रम आणतो आहोत. ज्याद्वारे शेतकऱ्यांची प्रगती करणाऱ्यावर भर दिला जाईल.
महत्वाच्या घोषणा
>शेतकऱ्यांसाठी १५ लाख कोटींच्या कर्जाची तरतूद
>शेतकऱ्यांसाठी विशेष रेल्वे सुरु करणार, त्यानुसार कृषिमाल वाहून नेण्यासाठी
>२०२५ पर्यंत दुग्ध उत्पादन दुप्पट करू.
>शेती ग्रामीण विकासासाठी ३ लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे.