वाळूज महानगरात 300 खाटांचे रूग्णालय उभारा : क्रांती सेनेची मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | अखिल भारतीय क्रांती सेनेच्या वतीने वाळूज महानगरात तीनशे खाटांचे उपजिल्हा रुग्णालय उभारावे अशी मागणी करणारे निवेदन अध्यक्ष संतोष तांबे पाटील आणि भाई नितीन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना देण्यात आले आहे. वाळूज महानगर परिसर हा औद्योगिक परिसर असून राज्यातील देशातील प्रत्येक कानाकोपऱ्यातून नागरिक या ठिकाणी रोजगारासाठी येत असतात.

औद्योगिक वसाहतीसाठी स्थानिक शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी शासनाला हव्या त्या किमतीने दिल्या आहेत. कमीत कमी पन्नास गावे याऔद्योगिक वसाहतीमुळे प्रभावित झालेली असून या ठिकाणची लोकसंख्या पाच ते सात लाखांच्या पुढे आहे. परंतु येथे शासनाच्या वतीने देण्यात येणार्‍या आरोग्य सुविधा अत्यंत मुबलक प्रमाणात आहेत .एवढी मोठी वसाहत असून देखील इथल्या आरोग्य सेवा फक्त आरोग्य उपकेंद्राच्या भरोशावर आहे हजारो कारखाने लाखो कामगार कष्टकरी यांच्यासाठी एकही सुसज्ज सरकारी दवाखाना या ठिकाणी नाही.

वर्षाला जवळपास पाच हजार कोटींचा महसूल या भागातून शासनाला दिला जातो. आणि त्या बदल्यात या जनतेला त्यांच्या हक्काच्या आरोग्य सुविधाही दिल्या जात नाही. या पार्श्वभूमीवर वाळूज महानगरात तातडीने तीनशे खाटांचे उपजिल्हा रुग्णालय उभारावे अशी मागणी अखिल भारतीय क्रांतीसेना आणि जनतेच्या वतीने करण्यात आली आहे. यावेळी अखिल भारतीय   क्रांती सेनेचे अध्यक्ष संतोष तांबे अखिल भारतीय क्रांती सेनेचे सरचिटणीस भाई नितीन देशमुख, संपर्कप्रमुख साईनाथ तालुकाप्रमुख लक्ष्मण शेलार ,वाळूज महानगर अध्यक्ष दिनेश दुधाट, वाळूज महानगर उपाध्यक्ष दीपक गायकवाड, वाळूज महानगर अध्यक्ष औदुंबर देवडकर, जिल्हा संघटक राजू शेरे इत्यादी उपस्थित होते.

Leave a Comment