धक्कादायक ! भर रस्त्यात कार अडवून बिल्डरची निर्घृणपणे हत्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बेळगाव : वृत्तसंस्था – बेळगावमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका बांधकाम व्यावसायिकाची भर रस्त्यात हत्या करण्यात आली आहे. बिल्डर राजू मल्लप्पा दोड्डबोम्मन्नवर असे हत्या झालेल्या बिल्डरचे नाव आहे. घटनेच्या दिवशी राजू कारमधून जात असताना अज्ञात आरोपींनी त्यांना अडवले व त्यांच्या डोळ्यात मिर्ची पावडर टाकून त्यांच्यावर चाकूने वार केले. बेळगाव मंडोळी रोडवर भवानी नगर भागातील गणपती मंदिराजवळ हि हत्या करण्यात आली आहे. बिल्डर राजू मल्लप्पा दोड्डबोम्मन्नवर यांची हत्या कोणी व कोणत्या कारणातून केली हे अजून समजू शकलेले नाही.

काय आहे प्रकरण?
बांधकाम व्यावसायिक राजू मल्लप्पा दोड्डबोम्मन्नवर यांच्यावर मंगळवारी पहाटे सहा वाजताच्या सुमारास काही अज्ञातांनी हल्ला करून करून त्यांची हत्या केली आहे. राजू मल्लप्पा दोड्डबोम्मन्नवर हे भवानी नगरातील संस्कृती पाम्यचे रहिवासी होते.

नेमकं काय घडलं?
घटनेच्या दिवशी राजू हे कारमधून जात असताना त्यांना वाटेत अडवण्यात आले. यावेळी अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या डोळ्यात मिर्ची पावडर फेकली आणि त्यांच्यावर चाकूने सपासप वार करून त्यांची निर्घृणपणे हत्या केली. या प्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

Leave a Comment