रेरा कायद्या अंतर्गत आता एक फ्लॅट एकच ग्राहकाला विकू शकणार बिल्डर; ग्राहकांच्या फसवणूकीचे प्रमाण होईल कमी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई | घर खरेदी करण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या लोकांसाठी एक चांगली बातमी आहे. आता यापुढे घर खरेदी करताना बिल्डरकडून ग्राहकांची फसवणूक होणार नाही. कारण, रेरा कायद्यांतर्गत आता यापुढे एक फ्लॅट केवळ एकच व्यक्तीला विकता येऊ शकणार आहे. अशी माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.

अनेक बिल्डर हे एकच फ्लॅट अनेक ग्राहकांना विकून ग्राहकांची फसवणूक करत होते. त्यामुळे यापुढे एक फ्लॅट हा अनेकांना विकून फसवणूक करता येणार नाही. यापूर्वी अशा फसवणुकीच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्याच्या केसेस अजूनही प्रलंबित आहेत. अनेक लोकांना एकच फ्लॅटची विक्री केल्यानंतर कालांतराने ग्राहकाला फसवणूक झाल्याचे कळते.

याबाबत माहिती देताना गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले की, अशी फसवणूक झालेले अनेक लोक अनेक ठिकाणी दाद मागायला जातात. ते बऱ्याचदा आमच्याकडेही येतात. पण यापूर्वी कायद्यात काही तरतूद नसल्याने यावर काही कारवाई होऊ शकत नव्हती. आता कायद्यात बदल झाला असल्यामुळे यापुढे एका बिल्डर ला असे काही करता येणार नाही.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा  WhatsApp Group | Facebook Page

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment