मजुरांनी कामावर परतावं म्हणून बिल्डरनं केली थेट विमान तिकिटांची सोय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हैद्राबाद । देशात कोरोना लॉकडाऊनमध्ये शिथिलतात दिल्यांनतर आता अनेक राज्यांतील आपल्या घरी परतलेल्या श्रमिकांना परत बोलावण्याचं मोठं आव्हान आता उद्योग जगतासमोर उभं आहे. यात उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, छत्तीसगड राज्यातील मजुरांची संख्या अधिक आहे. दरम्यान, हैदराबादमधल्या एका बिल्डरनं मजुरांना कामावर परत आणण्यासाठी एक कमालीची शक्कल लढवली आहे. या बिल्डरनं आपल्या कन्स्ट्रक्शन साईटवर काम करणाऱ्या मजुरांना परत बोलावण्यासाठी त्यांना विमानाची तिकीटं बुक केली आहेत. या बिल्डरनं मजुरांना विमान प्रवासाची आशा दाखवत परत बोलावलं आहे. प्रत्येक तिकीटासाठी त्यानं ४०००-५००० रुपये खर्च केले आहेत. या साईटवर काम करणारे मजूर झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तामिळनाडू तसंच पश्चिम बंगालमधून इथं दाखल होणार आहेत.

‘प्रेस्टीज ग्रुप’चे ३ प्रोजेक्ट सध्या हैदराबादमध्ये सुरू आहेत. या ग्रुपचे उपाध्यक्ष सुरेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, मजुरांना परत आणण्यासाठी कंपनीनं विमानाची तिकीटं बुक केली आहेत. मजूर कामावर येण्यासाठी विमानाचाच वापर करतील, असं कॉन्ट्रॅक्टर्सलाही सांगण्यात आलं असल्याचे कुमार यांनी सांगितलं. लॉकडाऊन उघडल्यानंतर काम सुरू करण्याची परवानगी मिळेल परंतु, कामगारच नसतील तर काम कोण करणार? असा प्रश्न सध्या व्यावसायिकांना सतावत आहे. सध्या हैदराबादमध्ये जवळपास ५० टक्के मजुरांची कमतरता भासत आहे. त्यामुळेच हैदराबादच्या अनेक बिल्डरांनी मजुरांसाठी एसी रेल्वेचं तिकीटं बुक केले आहेत.लॉकडाऊन उघडल्यानंतर काम सुरू करण्याची परवानगी मिळेल परंतु, कामगारच नसतील तर काम कोण करणार? असा प्रश्न सध्या व्यावसायिकांना सतावतोय. हैदराबादमध्ये जवळपास ५० टक्के मजुरांची कमतरता भासतेय.त्यामुळेच हैदराबादच्या अनेक बिल्डरांनी मजुरांसाठी एसी रेल्वेचं तिकीटं बुक केले आहेत.

लॉकडाऊनमध्ये मजूर होते वाऱ्यावर
देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यानी २४ मार्च रोजी देशव्यापी लॉकडाऊन घोषित केलं. त्यानंतर किती दिवस लॉकडाऊन सुरू राहील याबद्दल निश्चितता नव्हती. अशातच हातातलं काम बंद पडल्यानं अनेक मजुरांनी उपासमारीची वेळ आली. लॉकडाऊनकाळात अनेक मजुरांना कन्स्ट्रक्शन साईटवर कुठलिही सुविधा किंवा त्यांच्या पोटापाण्याची व्यवस्था नसल्यानं अनेकांनी आपल्या घरी, आपल्या राज्यात परतण्याचा निर्णय घेतला. लाखो मजूर हजारो मैल पायीच आपल्या घरी निघाले. बरेच दिवस देशातील विविध महामार्गांवर घरी परतणाऱ्या मजुरांचे लोंढे पायीच चालत निघाल्याचे चित्र दिसत राहील. दरम्यान, गेल्या महिन्यात केंद्र सरकारनं व्यवस्था केलेल्या श्रमिक रेल्वेमधून मजुर आपल्या घराकडे आता जात आहेत. परंतु, लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळताच या मजुरांना पुन्हा कामावर बोलावण्याचं मोठं आव्हान व्यावसायिकांसमोर असतांना त्यांना परत बोलावण्यासाठी मोठं-मोठी अमिश देण्यात येत आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment