हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मलकापूर, बुलढाणा, चिखली, सिंदखेड राजा, बुलढाण्यातील सर्वात जास्त हायव्होल्टेज मतदारसंघांपैकी ही काही प्रमुख नावं… संजय गायकवाड, श्वेता महाले आणि राजेंद्र शिंगणे या महायुतीच्या विद्यमान आमदारांची आमदारकी धोक्यात आल्याचं दिसतंय.. दुसरीकडे महाविकास आघाडीच्या राजेश एकडे यांच्यासाठीही वाट सोपी दिसत नाहीये.. आणि या सगळ्यात राजकारणाची धमाकेदार फोडणी आणलीय ती रविकांत तुपकर यांच्या विधानसभेत सर्व जागा घडवण्याच्या घोषणेनं.. त्यामुळे येणाऱ्या विधानसभेला बुलढाणा जिल्ह्यातल्या सर्व मतदारसंघाचा विस्तृत आढावा घेणार आहोतच.. पण त्यातल्या काही महत्वाच्या चार विधानसभांचं राजकीय विष्लेषण या व्हिडीओच्या माध्यमातून पाहणार आहोत.. यंदा नेमकं आमदारकीचं मैदान कोण मारतंय, इथंपासून ते स्टँडिंग आमदार निकालात आर जातायात या पार.. त्या सगळ्याचा सविस्तर तरिही तितकाच इंटरेस्टींग आढावा..
यातला पहीला येतो तो मलकापूर मतदारसंघ ….. राष्ट्रीय महामार्ग 53 वरून प्रवास करत असाल तर मुक्ताईनगर सोडून मलकापूर तालुक्यात आपली कधी एन्ट्री होते, ते आपल्यालाही कळत नाही… म्हणूनच विदर्भाचं प्रवेशद्वार म्हणून मलकापूरची ओळख… भाजपचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या मलकापुरात १९९५ पासून आजपर्यंत आमदार चैनसुख संचेती निवडणूक लढवत आले… जिंकत आले… त्यांना हरवणं तसं काँग्रेससाठी कठीण काम होऊन बसलं होतं… हाजी रशीद जमादार हे मुस्लिम तर शिवचंद्र तायडे हे मराठा आणि अरविंद कोलते हे लेवा अशा उमेदवारांना समोर करून जातीय प्रयोग करून काँग्रेसने संचेती यांना चितपट करण्याचा प्लॅन आखला… पण संचेती यांनी आपल्या स्कीलने हे प्रयत्न हाणून पाडत आमदारकी आपल्या ताब्यात कायमच ठेवली… विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचं अध्यक्षपद सांभाळल्याने त्यांची राजकीय पत आणखीनच वाढली होती.. पण 2019 ला अखेर याला ब्रेक थ्रू मिळाला… भाजपच्या म्हणजेच संचेती यांच्या प्रचारासाठी फडणवीस, स्मृती इराणी, अभिनेता गोविंदा असे बडे खिलाडी प्रचाराच्या मैदानात उतरले होते… पण भाजपची लाट असतानाही मलकापूराने मात्र पहिल्यांदाच काँग्रेसच्या राजेश एकडे यांच्या बाजूने कौल दिला… 25 वर्षात पहिल्यांदाच नांदूर शहराला त्यामुळे विधानसभेचं प्रतिनिधित्व करायला मिळालं… मात्र आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी भाजपच्या संचेती यांची डॅमेज झालेली इमेज याचा फायदा यंदाही काँग्रेसच्या पथ्यावर पडू शकतो.. त्यात आपला हा पारंपारिक मतदारसंघ पुन्हा ताब्यात घेण्यासाठी भाजपनेही तगडी फिल्डींग लावल्यामुळे मतदारसंघात सध्या महायुती आणि महाविकास आघाडीला जिंकण्यासाठी दोन्ही बाजूला फिफ्टी चान्सेस आहेत.. पण सध्या तरी काँग्रेसचं पारडं मतदारसंघात थोडं उजवं दिसतंय…
दुसरा बुलढाणा विधानसभा …. बुलडाणा तालुका आणि मोताळा तालुका याचा मिळून बनलेला ‘बुलडाणा विधानसभा मतदारसंघ.. घाटाखालचे आणि घाटावरचे असा सुप्त संघर्ष मतदारसंघात प्रत्येक निवडणुकीत पाहायला मिळतो… मुळे उमेदवार निवडताना जातीपातीचं राजकारण तर होतंच पण त्याचबरोबर उमेदवार कुठल्या भागातला आहे हे सुद्धा पाहिलं जातं… तब्बल दोन टर्म विजयराज शिंदे यांनी बुलढाणा विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेचा भगवा झेंडा फडकवत ठेवला… पण २०१४ मध्ये याला धक्का बसला तो हर्षवर्धन सपकाळ यांच्या रुपानं.. काँग्रेसकडून उभ्या असणारे सपकाळ आमदार झाले.. खरंतर चौरंगी झालेली लढत आणि तेव्हा मनसेकडून निवडणुकीच्या रिंगणात असणाऱ्या संजय गायकवाड यांना दोन नंबरची मतं मिळाल्यामुळे सपकाळ यांचा विजय सोपा झाला.. यानंतरच्या पाच वर्षात जनसंपर्क, पक्षातील दिल्लीतील वाढेलेलं वजन आणि राहुल गांधी यांच्या यंग ब्रिगेडमधील नेते म्हणून ओळख मिळूनही हर्षवर्धन सपकाळ यांचा २०१९ ला पराभव झाला… कारण शिवसेना भाजप युती, मोदी लाट, वंचित फॅक्टर या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून शिवसेनेचे संजय गायकवाड निवडून आले.. मनसेतून शिवसेनेत येऊन आमदारकीचा स्पेस खाल्ल्यामुळे विजयराज शिंदे यांना शिवसेनेतून भाजपचं कमळ हाती घ्यावं लागलं.. पण पुन्हा शिवसेना फुटीत शिंदे गट भाजपसोबत आल्याने विजयराज शिंदे यांचं राजकीय अस्तित्व पुन्हा धोक्यात आलं… म्हणूनच लोकसभेला बुलढाण्यातून अर्ज दाखल करुन त्यांनी शिवसेनेची कोंडी कशी केली, हे आपण पाहीलच.. त्यात विद्यमान आमदार गायकवाड यांची बंडाळीमुळे इमेज खराब झाली… त्यांनी केलेल्या अनेक वादग्रस्त वक्तव्यामुळे ते अनेकदा अडचणीत आले.. त्यात बंडाळीमुळे कोअर शिवसैनिक आजही ठाकरेंच्या बाजूने असल्याचं लोकसभा निकालातूनही दिसल्यानं गायकवाडांची आमदारकी सध्या रेड झोनमध्ये आहे.. त्यात पक्षांतर्गत आणि भाजपमधूनच त्यांच्या आमदारकीला असणारा विरोध येत्या विधानसभेला त्यांना अडचणीचा ठरु शकतो.. त्यात विजयराज शिंदे यांनी पुन्हा शिवसेनेची मशाल हातात धरली तर मतदारसंघातलं वारं महाविकास आघाडीच्या बाजूने फिरु शकतं.. वायरल झालेले मारहाणीचे व्हिडिओ, महायुतीतील मित्रपक्षांना दिलेलं आव्हान आणि मराठा आरक्षणावरून निगेटिव्ह मध्ये जाणार मतदान एकत्रित करून पाहिलं तर यंदा संजय गायकवाड यांनच्यासाठी आमदारकीची वात बिकट आहे, एवढं मात्र नक्की…महाविकास आघाडीकडून ठाकरेंसोबत एकनिष्ठ राहीलेले जालिंधर बुधवंत यांनी मतदारसंघात मशालीचा उजेड कमी होऊ दिलेला नाहीये.. त्यामुळे या निष्ठेचं बक्षीस उमेदवारीच्या स्वरुपात त्यांना मिळू शकतं.. डाॅ मधुसुदन सावळे यांचीही आमदारकीची इच्छा लपुन राहीलेली नाहीच. त्यासोबत काँग्रेसकडून जयश्रीताई शेळके यांनीही कोणत्याही परिस्थितीत आमदारकी लढवायचीच.. यासाठी जणू गुडघ्याला बाशिंग बांधलंय.. त्यामुळे मविआसाठी जागावाटपाचा तीढा बुलढाण्यासाठी तरी सध्या कठीण होऊन बसलाय.. आघाडीच्या या बिघाडीत गायकवाडांच्या विजयाचा मार्ग सोपा होऊ नये, म्हणजे झालं… असं म्हणायची वेळ सध्या बुलढाण्यात आहे…
तिसरा आणि सर्वात जास्त इंटरेस्टींग चिखली विधानसभा… नागपूरनंतर विदर्भात प्रभावी केंद्र म्हणून चिखली ओळखली जाते. हे जरी खरं असल तरी भाजपचा या मतदारसंघात तीन वेळा विजय वगळता काँग्रेसचंच वर्चस्व बघायला मिळालं. भाजपच्या अंतर्गत बंडाळीमुळे कॉंग्रेसचे राहुल बोंद्रे हे 2009 आणि 2014 निवडणुकीत मोठ्या फरकाने विजय मिळवू शकले… त्यामुळे 2019 लाही पुन्हा एकदा बोंद्रे जिंकतील असं वाटत असताना भाजपच्या लाटेत आणि तूपकरांनी बोंद्रेच्या विरोधात आघाडी उघडल्यामुळे भाजपचा पंधरा वर्षांचा वनवास संपवून श्वेता महाले यांच्या रूपाने चिखलीत पुन्हा एकदा कमळ फुलले… या अत्यंत चुरशीच्या लढतीत महाले या 6 हजार 851 मतांचं मताधिक्य घेऊन विजय मिळवला. त्यांना 92 हजार 205 मते मिळाली. तर बोंद्रे यांना 85 हजार 433 मते मिळाली. त्यामुळे 2004नंतर भाजपला या मतदारसंघात प्रथमच विजय मिळविता आला…राज्यातील विविध प्रश्नावर महालेंनी आंदोलन केलं आहे. वीजबिल माफी, ट्रान्सफार्मर आणि लोडशेडिंगमुळे त्रस्त असलेल्यांना न्याय देणं, शेतकऱ्यांचे प्रश्न आदी मुद्द्यांकडे त्यांनी सतत सरकारचे लक्ष वेधले. कोरोना काळात अकोला आणि बुलडाण्यात लॅब सुरू करण्यासाठीही त्यांनी प्रयत्न केले होते… कोरोना काळात ग्रामीण भागातील सुमारे 4 हजार गरोदर महिलांना त्यांनी डाळींब, चिकू, केळी, टरबूज, पपई आणि खरबूजचे पॉकेट घरपोच पुरवले…आक्रमक आणि अभ्यासू स्वभावामुळे त्या अल्पावधीतच लोकप्रिय आमदार ठरल्या… करंट स्टेटस बद्धल बोलायचं झालं तर आमदार श्वेताताई महाले पाटील व माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्यात आगामी विधानसभा निवडणुकीची लढत होईल, अशी चिन्हं आहेत … तर शेतकरी नेते रविकांत तुपकर हेदेखील या मतदारसंघातून आपले भवितव्य अजमावू शकतात. वंचित बहुजन आघाडी स्वतंत्र लढली तर या मतदारसंघात चौरंगी लढतीचे संकेत आहेत…. पण सध्या तरी श्वेता महाले यांचं पारडं चिखलीमध्ये जड दिसतंय…
शेवटचा पाहुयात सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघाबद्धल… स्वराज्यजननी राजमाता जिजाऊंची जन्मभूमी अशी ओळख असलेल्या सिंदखेड राजामध्ये विद्यमान आमदार आहेत राष्ट्रवादीचे राजेंद्र शिंगणे… 2019 ला शिवसेनेचे स्टॅंडिंग खासदार शशिकांत खेडेकर यांना धूळ चारत शिंगणे यांनी मतदारसंघात राष्ट्रवादीला बस्तान बांधून दिलं… पण करायला गेलो एक अन् झालं दुसरंच अशी अवस्था सध्या सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाचे माजी आ. शशिकांत खेडेकर यांची झालीय. कारण अजितदादांच्या फुटीत शिंगणे सुद्धा महायुतीत आल्यानं आता विद्यमान आमदाराचा फिल्टर लावला तर त्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाला जागा सुटण्याचे जास्त चान्सेस आहेत… म्हणूनच दादा गटाचे काही आमदार पुन्हा एकदा शरद पवार गटान जाण्याची चर्चा सुरू आहे, तसं झालंच तर त्यात पहिला नंबर डॉ. राजेंद्र शिंगणेंचा असावा अशी मनोमन इच्छा डॉ. खेडेकरांना वाटत असावी…बाकी महायुतीकडून केवळ एकटे खेडेकरच इच्छुक आहेत का तर नाही.. तोताराम कायंदे, डॉ. सुनील कायंदे, विनोद वाघ, डॉ. गणेश मांटे, आता नव्याने तयारीला लागलेले योगेश जाधव यांच्या आमदार होण्याच्या इच्छा काही लपून राहिलेल्या नाहीत. त्यामुळे इच्छुक उमेदवारांच्या भाऊ गर्दीमुळे सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात महायुतीत चांगलाच जांगडगुत्ता निर्माण झालाय…भाजपला सत्तेपासून दुर ठेवण्यासाठी राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग झाला.. विद्यमान आमदार शिंगणे कॅबिनेट मंत्री झाले.. पालकमंत्री झाले.. त्यामुळे विवीध भुमिपुजनावरुन, श्रेयवादावरुन दोघांच्यात बरीच वादावादी झाली…
अर्थात या सगळ्यात खेडेकरांचा जीव गुदमरु लागला.. आपलं राजकारण संपतय की काय अशी भीती त्यांना लागून राहीलेली असताना शिवसेनेत दोन गट पडल्याने खेडेकरांचा श्वास मोकळा झाला आणि त्यांनी राजेंद्र शिंगणेंना आव्हान देण्यासाठी शिंदे गटाची वाट धरली.. पण पुढे अजितदादा युतीत आले आणि त्यांच्या पाठोपाठ शिंगणे देखील.. त्यामुळे खेडेकर यांच्या आमदारकीच्या वाटा आणखीन बिकट झाल्या आहेत.. दुसरीकडे रविकांत तुपकर यांना याच मतदारसंघातून ३० हजारांचं लीड मिळालंय.. त्यात त्यांनी जिल्ह्यातल्या सहाही जागा लढवण्याचा निर्णय घेतल्यानं सिंदखेड राजाची तरी परिस्थिती फारशी गुंतागुंतीची होऊन बसलीय.. तर अशी होती बुलढाणा जिल्ह्यातल्या प्रमुख चार विधानसभा मतदारसंघांची येणाऱ्या विधानसभेला बघायला मिळणारी राजकीय समीकरणं.. बाकी महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा इथलाही प्रमुख सामना असला तरी रविकांत तुपकर इथं किंगमेकरच्या भुमिकेत दिसण्याचे चान्सेस जास्त वाटतायत.. बाकी या चार जागांबद्धल तुमचं काय प्रिडीक्शन आहे, ते आम्हाला कमेंट करुन नक्की सांगा.