शेगावमध्ये कार- ट्रकचा भीषण अपघात, 5 भाविकांचा जागीच मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बुलडाणा : हॅलो महाराष्ट्र – बुलडाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या खामगाव – जालना महामार्गावर देऊळगाव राजा या ठिकाणी एक भीषण अपघात घडला आहे. यामध्ये बोलेरो कार आणि ट्रक यांच्यात हा अपघात घडला आहे. या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर चौघे जण गंभीर जखमी झाले आहेत. या मृतांमध्ये कार चालकाचा समावेश आहे. हे भाविक जालना येथून शेगाव या ठिकाणी गजानन महाराजांच्या दर्शनासाठी निघाले होते. मात्र त्याअगोदर नियतीने त्यांच्यावर घाला घातला. यावेळी बोलेरो कार आणि ट्रक यांच्यात धडक होऊन मोठा अपघात घडला. सोमवारी पहाटे साडे पाच वाजताच्या सुमारास हा अपघात झाला.

नेमकं काय घडलं?
देऊळगाव राजा जवळ भाविकांच्या बोलेरो गाडीला भीषण अपघात झाला. या अपघातात 5 जण ठार झाले, तर चार जण जखमी झाले आहेत. बुलडाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या खामगाव – जालना महामार्गावर बोलेरो गाडी आणि ट्रकमध्ये भीषण धडक झाल्याने हा भीषण अपघात घडला. या मृतांमध्ये बोलेरो चालक, एक महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे.

शेगावला जाताना अपघात
अपघातग्रस्त बोलेरो गाडी भाविकांना घेऊन जालना येथून शेगाव येथे गजानन महाराज दर्शनासाठी निघाली होती. मात्र यादरम्यान काळाने या भाविकांवर घाला घातला. या अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींवर देऊळगाव राजा तसेच जालना येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आज सकाळी साडे पाच वाजताच्या सुमारास अपघात घडला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Leave a Comment