बुलढाण्यात तलाठ्याची गळफास घेऊन आत्महत्या, कारण अजूनही अस्प्ष्ट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बुलढाणा : हॅलो महाराष्ट्र – बुलडाणा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये नारायण पाटीलबा देठे या तलाठ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्यांनी स्वत:च्या शेतातील आंब्याच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. मात्र नारायण पाटीलबा देठे यांनी नेमकी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली हे अजून स्पष्ट झाले नाही. ते बुलडाणा तालुक्यातील सातगाव म्हसला येथील रहिवासी होते, तर भडगाव या ठिकाणी कार्यरत होते. सकाळी पत्नी त्‍यांना शेतात बघण्यासाठी गेली असता ते गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. यानंतर धाड पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. त्यानंतर धाड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह उतरवून पंचनामा केला.

काय आहे प्रकरण?
बुलडाणा जिल्ह्यातील नारायण पाटीलबा देठे यांनी आपल्या शेतातील आंब्याच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ते पेशाने वकील असून भडगाव या ठिकाणी कार्यरत होते.

आत्महत्येचे कारण अजूनही अस्पष्ट
नारायण पाटीलबा देठे हे बुलडाणा तालुक्यातील सातगाव म्हसला येथील रहिवासी होते, तर भडगाव या ठिकाणी कार्यरत होते. मात्र नारायण पाटीलबा देठे यांनी नेमकी कोणत्या कारणातून आत्महत्या केली हे अजून स्पष्ट झाले नाही.

पत्नीला शेतात दिसले भयावह दृश्य
घटनेच्या दिवशी सकाळी मृत नारायण पाटीलबा देठे यांच्या पत्नी त्यांना शेतात बघण्यासाठी गेल्या असता ते गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. यानंतर धाड पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. त्यानंतर धाड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह उतरवून पंचनामा केला.

Leave a Comment