नकली नोटा प्रकरणी बुलढाण्यातील एमआयएमच्या ‘या’ माजी जिल्हाध्यक्षाला अटक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बुलढाणा : हॅलो महाराष्ट्र – बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर या ठिकाणी नकली नोटा प्रकरणात पोलिसांनी एक मोठी कारवाई करत एमआयएमच्या माजी जिल्हाध्यक्षाला अटक केली आहे. शहजाद खान सलीम खान असे अटक करण्यात आलेल्या एमआयएमच्या माजी जिल्हाध्यक्षाचे नाव आहे. एएमआयएम या पक्षातून महिनाभरापूर्वी पायउतार झालेले माजी जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक शहेजाद खान यांना मलकापूरातील मालीपुरा मंगलगेट परिसरातून बुधवारी अटक करण्यात आली. या प्रकरणी न्यायालयाने त्यांना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

काय आहे प्रकरण ?
23 फेब्रुवारी रोजी मलकापूर शहरातील एचडीएफसी बँकेत नकली नोटा जमा केल्याचे प्रकरण उघडकीस आले होते. या प्रकरणातील मुख्य आरोपी ईरफान हनीफ पटनी मुळ रा. गुजरात मु. वडनेर याच्यासह खामगाव, मलकापुर, नांदुरा येथून आतापर्यंत सहा आरोपींना शहर पोलिसांनी यापूर्वी अटक केली आहे. यानंतर आज पहाटे तीन वाजायच्या सुरस शहर पोलिसांनी इत्तेहादुल मुस्लिमीन एएमआयएम या पक्षातून एक महिन्यापूर्वी पदावरून पायउतार कारण्याता आलेले माजी जिल्हाध्यक्ष, नगरसेवक शहजाद खान सलीम खान यांना अटक केली आहे.

या अगोदर या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीने शहेजाद खान याच्या नावाची कबुली दिल्याने ही अटक करण्यात आली आहे. यानंतर शहेजाद खान याला न्यायालयासमोर हजार केले असता न्यायालयाने 19 मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. नकली नोटा चलनात आणण्याच्या या गोरखधंद्यात जिल्हाभरात साखळीच असून लवकरच या साखळीचा पर्दाफाश करण्यात येणार असल्याचे तपास अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. एमआयएमच्या माजी जिल्हाध्यक्षाला नकली नोटा प्रकरणात अटक करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Leave a Comment