अखेर ‘त्या’ हत्येचे गूढ उलघडण्यात पोलिसांना आले यश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बुलढाणा : हॅलो महाराष्ट्र – बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील नागझरी गावातील पंक्चर दुरुस्तीचे काम करणाऱ्या रामधन दांदळे याच्या हत्येचे गूढ उलघडण्यात अखेर पोलिसांना यश आले आहे. त्याची हत्या त्याच्या पत्नीनेच केल्याचे स्पष्ट झाले आहे. पतीची हत्या केल्यानंतर पत्नीने त्याचा मृतदेह साथीदारांच्या मदतीने रेल्वे रुळांवर फेकला होता.

हाती आलेल्या माहितीनुसार,सोमवारी हात पाय बांधलेल्या अवस्थेमध्ये नागपूर-मुंबई रेल्वे मार्गावरील नागझरी रेल्वे स्थानकाजवळ एक मृतदेह आढळून आला होता. या व्यक्तीची हत्या हत्या झाल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले होते. त्यानंतर पोलिसांनी आपला तपास सुरु केला. तपास करत असताना हा मृतदेह नागझरी गावातील रामधन दांदळे याचा असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर पोलिसांना या मृत्यूचे गूढ उलघडण्यात यश आले आहे. त्याची हत्या त्याच्याच पत्नीने केली होती. हत्या करून झाल्यानंतर त्याच्या पत्नीने आपल्या साथीदाराच्या मदतीने रामधन दांदळे याचा मृतदेह रेल्वे रुळांवर फेकला. हे प्रकरण उघडकीस आल्याने शेगाव पोलिसांनी आरोपी पत्नी आणि तिच्या सहकाऱ्याला अटक केली आहे.

अशा प्रकारे उघड झाला गुन्हा
रामधन दांदळे याची पत्नी रेखा दांदळे हिने आपला पती रात्रीपासून अचानक बेपत्ता झाला होता अशी माहिती पोलिसांना दिली होती. त्यानंतर पोलिसांना रामधन दांदळे याचा मृतदेह रेल्वे रुळांवर सापडला होता. त्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. या तपासासाठी पोलिसांनी बुलढाणा येथून श्वान पथकाला पाचारण केले होते. श्वान पथकातील ज्युली हिने आरोपींचा माग काढण्यात मोलाची कामगिरी बजावली. पोलिसांनी पत्नी रेखा आणि तिचा साथीदार संतोष साठे याला संशयित म्हणून ताब्यात घेतले. सुरुवातीला त्यांनी आपला गुन्हा कबूल केला नाही. त्यानंतर पोलिसांनी खाक्या दाखवताच, दोघांनी आपण केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली. या गुन्ह्यामध्ये अजून कोणी सहभागी होते का याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.

Leave a Comment