Bullet Train : मुंबई ते अहमदाबाददरम्यान धावणारी देशाची पहिली बुलेट ट्रेन लवकरच प्रत्यक्षात येणार आहे. या महत्वाकांक्षी प्रकल्पाची वाट देशवासीय अनेक वर्षांपासून पाहत आहेत. याच पार्श्वभूमीवर रेलमंत्री अश्विनी वैष्णव यांनी महत्वाची (Bullet Train) माहिती दिली आहे.
360 किलोमीटरचं काम जवळपास पूर्ण (Bullet Train)
रेलमंत्री वैष्णव यांनी सांगितलं की, बुलेट ट्रेन प्रकल्पातील 360 किमीचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. मात्र, महाराष्ट्रातील तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारने वेळेवर परवानगी न दिल्यामुळे तब्बल अडीच वर्षांचा विलंब झाला, असे त्यांनी स्पष्ट केले.
केंद्रीय मंत्री रवनीत सिंह बिट्टू यांची पहिली पाहणी
दरम्यान, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रवनीत सिंह बिट्टू यांनी शनिवारी पहिल्यांदाच मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल्वे (Bullet Train) प्रकल्पाची पाहणी केली. त्यांनी या प्रकल्पाचे आणि देशातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले.
पंतप्रधान मोदींचं स्वप्न साकारतेय बुलेट ट्रेन (Bullet Train)
रवनीत सिंह बिट्टू यांनी सांगितलं की, ही बुलेट ट्रेन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आधुनिक रेल्वे नेटवर्कच्या दृष्टिकोनाचा एक भाग आहे. या प्रकल्पामुळे जवळपास 1 लाख लोकांना रोजगार मिळाला आहे. ते म्हणाले, “मी पहिल्यांदाच येथे आलो आहे. हे पंतप्रधान मोदींचं व्हिजन आहे, आणि त्यांच्या या कल्पनेमुळे देशाला एक अत्याधुनिक प्रकल्प मिळतोय. हे प्रकल्प देशाच्या प्रगतीसाठी खूप महत्वाचे आहेत.”
13 नद्यांवर पूल, डोंगर फोडून टनेल (Bullet Train)
508 किलोमीटर लांबीच्या या हाय-स्पीड रेल्वे प्रकल्पावर तब्बल 1.08 लाख कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. मात्र, सततच्या विलंबामुळे खर्च आणखी वाढण्याची शक्यता आहे. प्रकल्प मार्गावर 13 नद्यांवर पूल बांधण्यात आले असून, 5 स्टील पूल आणि 2 पीएसएसी पूलच्या माध्यमातून विविध रेल्वे मार्ग आणि महामार्ग ओलांडले जातील. गुजरातमध्ये ट्रॅक बसवण्याचं काम वेगाने सुरू आहे.
शांततेसाठी नॉइज बॅरियर (Bullet Train)
प्रदूषण आणि आवाजाची पातळी कमी करण्यासाठी सुमारे 112 किमी लांबीच्या मार्गावर नॉइज बॅरियर बसवले आहेत. याशिवाय, महाराष्ट्रात BKC ते ठाणे दरम्यान 21 किमी लांबीचा भुयारी मार्ग (Tunnel) सध्या बांधकामाच्या टप्प्यात आहे.
पालघर जिल्ह्यात 7 पर्वतीय बोगद्यांचे (Mountain Tunnels) काम NATM तंत्रज्ञानाद्वारे सुरू आहे, तर गुजरातमधील वलसाड येथे एक पर्वतीय बोगदा पूर्ण झाला आहे.
कधी सुरू होणार बुलेट ट्रेन? (Bullet Train)
2026 मध्ये बुलेट ट्रेनचे ट्रायल रन सुरू होण्याची शक्यता आहे. गुजरातमध्ये सूरत आणि अहमदाबाद येथील बुलेट ट्रेन स्टेशनचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. याशिवाय, साबरमती मल्टीमॉडल ट्रान्झिट हबही पूर्णपणे तयार आहे.
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन 12 स्टेशन्सवर थांबेल आणि अवघ्या 3 तासांत 508 किमीचे अंतर पार करेल. या बुलेट ट्रेनची गती ताशी 350 किमी इतकी असणार आहे, जी भारतातील सर्वात वेगवान रेल्वे सेवा ठरेल.