हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Bullet Train । एकीकडे मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम प्रगतीपथावर असताना आता देशाला आणखी एक नवीन बुलेट ट्रेन मिळणार आहे. दिल्ली ते हावडा अशी हि बुलेट ट्रेन असणार आहे. नुकतंच या बुलेट ट्रेनचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून त्याबाबतचा अहवाल रेल्वे मंत्रालयालाकडे सादर करण्यात आला आहे. या प्रस्थावित बुलेट ट्रेनचे बांधकाम २ टप्प्यात केले जाईल. पहिल्या टप्प्यात दिल्ली ते वाराणसी दरम्यानचे काम पूर्ण केले जाईल, तर दुसऱ्या टप्प्यात वाराणसी ते हावडा हे काम पूर्ण केले जाईल. या मोठ्या प्रकल्पासाठी एकूण ५ लाख कोटी रुपये खर्च केले जातील. देशाच्या राजधानी पासून पूर्वेकडील भागाला या बुलेट ट्रेन मुळे मोठा फायदा होणार आहे.
कसा असेल रूट – Bullet Train
दिल्ली ते हावडा हि बुलेट ट्रेन (Bullet Train) दिल्ली आणि पश्चिम बंगाल या २ राज्याना जोडण्याचे काम करेल. तसेच या दोन्ही राज्यांदरम्यान येणाऱ्या इतर राज्यातील कनेक्टिव्हिटी सुद्धा सुधारेल. हि बुलेट ट्रेन दिल्लीपासून सुरू होईल. दिल्लीहून निघाल्यानंतर, ट्रेन थेट आग्रा कॅन्टला पोहोचेल. आग्रा कॅन्टनंतर, कानपूर सेंट्रल, नंतर अयोध्या आणि लखनऊ मार्गे वाराणसीला पोहोचेल. वाराणसीनंतर, ती पटनाला पोहोचेल. पाटणा नंतर हि बुलेट ट्रेन पश्चिम बंगाल मध्ये एंट्री करेन आणि शेवटचा स्टॉप असलेल्या हावडा जंक्शनला पोचेल. या बुलेट ट्रेन प्रकल्पाची लांबी 1669 किलोमीटर इतकी राहणार असून ती मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रमाणे ताशी 350 किलोमीटर इतक्या वेगाने धावेल.
साडेसहा तासांचा प्रवास वाचणार
प्रस्तावित बुलेट ट्रेनमुळे (Bullet Train) दिल्ली आणि हावडा (Delhi To Howrah) दरम्यानचा प्रवास वेळ साडेसहा तासांपर्यंत कमी होईल. यामध्ये दिल्ली ते पाटणा (१०७८ किमी) चार तासांचा प्रवास आणि पटणा ते हावडा (५७८ किमी) दोन तासांचा प्रवास समाविष्ट आहे. दिल्लीहून सुटल्यानंतर, बुलेट ट्रेन उत्तर प्रदेशातील ५, बिहारमधील एका आणि पश्चिम बंगालमधील दोन स्थानकांवर थांबेल. दिल्ली, आग्रा कॅन्ट, कानपूर सेंट्रल, अयोध्या, लखनऊ, वाराणसी, पाटणा, आसनसोल आणि हावडा ही 9 स्थानक या बुलेट ट्रेन प्रकल्पांतर्गत विकसित होणार आहेत. रेल्वे या ट्रेनसाठी पाटण्यामध्ये ६० किमीचा एलिव्हेटेड ट्रॅक बांधणार आहे.