व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

रिक्षाचालकांची गुंडगिरी ! प्रवाशाला बेदम मारहाण, भर रस्त्यात राडा

औरंगाबाद – प्रवाशी शुल्कावरुन वाद होऊन काही रिक्षाचालकांनी एकत्र एका प्रवाशाला बेदम मारहाण केल्याची घटना शहरातील मध्यवर्ती बस स्थानकासमोर घडली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात एसटीचा संप सुरुर आहे. अशातच एसटी बसची संख्या कमी असल्यानं अनेकदा प्रवाशांना रिक्षा शिवाय दुसरा पर्याय उरत नाही. याच गैरसोयीचा फायदा उचलत काही रिक्षा चालकांनी मनमानी भाडेवाढ करत आपली मुजोरी सुरु केली आहे.

लॉकडाऊन व कोरोनामुळे आधीच महागाईन सर्वसामान्य माणूस बेजार झाला आहे. त्यात रिक्षा प्रवास परवडत नसतानाही पर्याय नसल्यान आता लोकांना अधिकची रक्कम मोजावी लागते आहे. दरम्यान, एका प्रवाशानं वाढीव प्रवासी शुल्कावरुन आवाज उठवल्यानं इतर रिक्षा चालकांनी त्यांच्यासोबत आधी वाद घातला. त्यानंतर ही बाचाबाची इतकी वाढली की रिक्षाचालकांनी अखेर गुंडगिरी करत प्रवाशालाच मारहाण केली.

जवळपास चार ते पाच रिक्षा चालकांनी एकत्र येत प्रवाशाला बेदम मारहाण केली आहे. लाथा बुक्क्यांनी प्रवाशाला मारहाण केल्यानं यात एक प्रवासी जखमी झाला आहे. दरम्यान, बाचाबाची आणि वाद यामुळे मध्यवर्ती बस स्थानक परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.