T20 विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा ६ धावांनी पराभव केला. अत्यंत अटीतटीच्या आणि रोमहर्षक सामन्यात भारताने पाकिस्तानला पराभवाची धूळ चारत बाप बाप होता है आणि बेटा बेटा होता है हे दाखवून दिले. पाकिस्तानच्या तोंडातला घास हिरावून भारताने अंतिम क्षणी बाजी मारली. भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरला तो म्हणजे बूम बूम बुमराह (Jasprit Bumrah) ….. अगदी मोक्याच्या क्षणी महत्वपूर्ण विकेट घेऊन बुमराने भारतीय संघाला सामन्यात जिवंत ठेवलं आणि रोमहर्षक विजयाचा तो मानकरी ठरला.
ती विकेट ठरली टर्निंग पॉईंट-
अवघ्या १२० धावांचे लक्ष्य घेऊन उतरलेल्या पाकिस्तानने चांगली सुरुवात केली. बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान या अनुभवी जोडगोळीने न्यूयॉर्कच्या खडतर खेळपट्टी वर सावध फलंदाजी केली. लक्ष्य मोठं नसल्याने आणि फलंदाजी करणं सोप्प नसल्याने पाकिस्तानची बॅटिंग निवांत चालली होती. संघाचा स्कोर २६ असताना बाबर आझम माघारी परतला. त्यानंतर संघाची धावसंख्या ५७ असताना उस्मान खान बाद झाला. एकवेळ पाकिस्तानला विजयासाठी 48 चेंडूत 48 धावांची गरज होती, आठ विकेट हातात होत्या. मोहम्मद रिझवान आणि फखर झंमन हे अनुभवी फलंगदाज मैदानात होते. हार्दिक पांड्याने 13 व्या षटकात फखर झंमन याचा अडथळा दूर केला. त्यानंतर 15 व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर जसप्रीत बुमराह यानं मोहम्मद रिजवान याचा त्रिफाळा उडवला. रिजवानची हीच विकेट भारताच्या विजयात टर्निंग पॉईंट ठरली.
रिझवानच्या विकेटनंतर पाकिस्तानचा संघ बॅकफूटवर गेला. शादाब खान, इफ्तिखार अहमद आणि इमाद वासीम यांच्यात फलंदाचीजी चांगली क्षमता असूनही भारताच्या खडूस बॉलिंग समोर ते पुरते निष्प्रभ ठरले. शादाब खानने ५, इफ्तिखार अहमद ०आणि इमाद वासीमने १५ धावा केल्या. परंतु यादरम्यान अनेक निर्धाव चेंडू गेले. परिणाणी अखेरच्या षटकात पाकिस्तानला विजायासाठी 17 धावांची गरज होती. अर्शदीप सिंहने 11 धावा देत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केेल.