कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
आजारी आई- वडिलांच्या खर्चासाठी आणलेले पैसे पाटण कॉलनी येथील घर फोडून चोरट्यांनी 20 हजारांच्या रोकडसह इतर साहित्य पळवले. गुरूवारी 15 जुलै रोजी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी वैशाली सुरेश मोघे (वय 51 वर्षे, सध्या रा श्रीरामदर्शन, कात्रज पुणे, मुळ रा.पाटण कॉलनी शनिवार पेठ कराड) यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मोघे या नोकरीनिमीत्त पुणे येथे राहणेस आहेत. पाटण कॉलनी कराड येथील घरी त्यांचे वडील सुरेश सदाशिव मोघे, आई सौ. विना मोघे असे राहणेस आहेत. वैशाली मोघे या अधून मधुन सुट्टीकरीता आई वडीलांकडे कराड येथे येत जात असते. दरम्यान वैशाली यांची आई सह्याद्री हाँस्पीटल तर वडील अजारी असल्याने कराड हॉस्पीटल येथे अँडमीट आहेत. त्यामुळे 7 जुलै 2021 रोजी पुणे येथुन त्या कराडला आले आहेत. येताना त्यांनी खर्चासाठी 20 हजार रुपये आणले होते. ते पर्समध्ये ठेवले होते तसेच पर्समध्ये जनता बँक पुणे शहर, एसबीआय पुणे, एसबीआय कात्रज या बँकेचे एटीएम, जनता बँकेचे चेकबुक, डायरी इत्यादी पर्समध्ये ठेवुन ती पर्स घरातील मधल्या खोलीत लाकडी कपाटात ठेवली होती.
बुधवारी 14 जुलै रोजी रात्री वैशाली मोघे पाटण कॉलनी कराड येथील हॉलचे लाकडी दरवाजास कडी लावुन बाहेरील लोखंडी दरवाजास कुलुप लावुन वडीलांकरीता जेवण घेवुन कराड हाँस्पीटल येथे गेल्या होत्या. 15 जुलै रोजी सकाळी सहा वाजता त्या परत पाटण कॉलनी कराड येथील राहते घरी आल्या असता घराचे लोखंडी दरवाजाचा कोयंडा कशाने तरी कापलेला दिसला व कुलुप घराबाहेर पडलेले दिसले. त्यांनी घरात जावून पाहिले असता घरातील लाकडी कपाटात ठेवलेली माझी पर्स दिसली नाही. त्यामधे असलेली 20 हजार रूपयांची रक्कम, एटीएम, चेकबुक ठेवलेली पर्स चोरीस गेली आहे. याबाबत मोघे यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली असून याप्रकरणी अज्ञात चोरट्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.