UPI चा परदेशातही जलवा!! आता ‘या’ देशाने डिजिटल ट्रान्सझॅक्शन्ससाठी सुरू केले UPI

नवी दिल्ली । डिजिटल अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी देशात सुरू झालेल्या UPI सिस्टीमला आता परदेशातही मागणी आहे. भारताची UPI सिस्टीम स्वीकारणारा नेपाळ पहिला देश ठरला आहे. यामुळे शेजारील देशाची डिजिटल अर्थव्यवस्था मजबूत होण्यास मदत होईल. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) च्या आंतरराष्ट्रीय शाखेने नेपाळमध्ये सर्व्हिस देण्यासाठी गेटवे पेमेंट्स सर्व्हिस (GPS) आणि मनम इन्फोटेक यांच्याशी हातमिळवणी केली आहे.

GPS नेपाळमधील अधिकृत पेमेंट सिस्टीम ऑपरेटर आहे. मनम इन्फोटेक नेपाळमध्ये युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस लागू करेल. NPCI ने एका निवेदनात म्हटले आहे की,”या टाय-अपमुळे नेपाळमधील लोकांची सोय होईल आणि डिजिटल ट्रान्सझॅक्शन्सना प्रोत्साहन मिळेल.”

शेजारील देशाची अर्थव्यवस्था मजबूत होईल
नेपाळ हा भारताबाहेरील पहिला देश असेल ज्याने कॅश ट्रान्सझॅक्शन्सच्या डिजिटायझेशनला प्रोत्साहन देणारे UPI पेमेंट प्लॅटफॉर्म म्हणून स्वीकारले आहे. GPS चे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) राजेश प्रसाद मानंधर म्हणाले की,” UPI सर्व्हिसेसचा भारतातील डिजिटल पेमेंटच्या बाबतीत मोठा सकारात्मक परिणाम झाला आहे. आम्‍हाला आशा आहे की, नेपाळमधील डिजिटल अर्थव्यवस्थेचा कायापालट करण्‍यात आणि कमी कॅश असलेला समाज निर्माण करण्‍यात UPI महत्त्वाची भूमिका बजावेल.”

जागतिक ओळख निर्माण करण्यास मदत होईल
NIPL चे सीईओ रितेश शुक्ला म्हणाले की,”आम्हाला खात्री आहे की, या उपक्रमामुळे NIPL ची तांत्रिक क्षमता आणि जागतिक स्तरावर त्याच्या अतुलनीय ऑफर वाढविण्यात मदत होईल. UPI ने 2021 मध्ये $940 अब्ज किंमतीचे 3,900 कोटी आर्थिक व्यवहार सक्षम केले, जे भारताच्या GDP च्या सुमारे 31 टक्के इतके आहे.”

इंटरनेटशिवाय UPI तयारी
NPCI सध्या UPI लाईट वर काम करत आहे. UPI Lite च्या मदतीने तुम्ही इंटरनेट कनेक्शनशिवाय देखील पेमेंट करू शकता. याचा फायदा देशातील ग्रामीण भागातील कोट्यवधी लोकांना होणार आहे, जिथे इंटरनेट नीट चालवता येत नाही. UPI Lite द्वारे, कोणतीही व्यक्ती फीचर फोनवरून डिजिटल पेमेंट करू शकेल.