Saturday, March 25, 2023

खंबाटकी घाटात ‘बर्निंग कार’चा थरार; जीवितहानी टळली

- Advertisement -

सातारा | सकलेन मुलाणी

खंडाळा तालुक्यातील खंबाटकी घाटात साताऱ्याच्या दिशेने जाणाऱ्या कारने बुधवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास अचानक पेट घेतला. यावेळी चालकाने प्रसंगावधान राखत गाडी रस्त्याच्या बाजूला घेत गाडीतून बाहेर उडी घेतली. चालकाने प्रसंगावधान दाखवल्याने पुढील अनर्थ टळला.

- Advertisement -

चालक बाहेर पडताच क्षणार्धातच संपूर्ण गाडीने पेट घेतला. या घटनेची माहिती मिळताच हायवे हेल्पलाईनचे कर्मचारी आणि खंडाळा पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली. पाण्याच्या टँकरने ही पेटती कार विझवण्याचा यावेळी प्रयत्‍न करण्यात आला. मात्र तोपर्यंत संपूर्ण कार बेचिराख झाली होती. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.