नवी दिल्ली : हरियाणातील रोहतक या ठिकाणी रेल्वे स्टेशन मधील उभे असलेल्या रेल्वेला अचानक आग लागल्याने रेल्वेचे तीन डबे बघता-बघता जळून खाक झाले. हरियाणातील रोहतक रेल्वे स्थानकात दिल्लीहून येणाऱ्या मेमू ट्रेनच्या तीन डब्यांना अचानक आग लागल्याची माहिती समोर आली आहे. ही आग इतकी भीषण होती की, अवघ्या काही वेळातच ट्रेनचे तिन्ही डबे जळून खाक झाले आहेत. उत्तर रेल्वेच्या अधिकाऱ्यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, मेमू ही गाडी संध्याकाळी 4.10 वाजण्याच्या सुमारास रोहतकडून दिल्ली येथे रवाना होणार होती. मात्र आज (8 एप्रिल ) दुपारी 2.10 वाजण्याच्या सुमारास ट्रेन मध्ये आग लागली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी ताबडतोब दाखल झाल्या आणि त्यांनी आग विझवायला सुरुवात केली. मात्र ही आग नक्की कशामुळे लागली याची माहिती अद्याप मिळू शकली नाही.उत्तर रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी दीपक कुमार यांनी याबाबत माहिती दिली आहे.
Haryana: Fire broke out in four coaches of a parked train at Rohtak Railway Station; no casualty reported, fire doused pic.twitter.com/mCKfdtAoLt
— ANI (@ANI) April 8, 2021
ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा WhatsApp Group | Facebook Page