Bus Accident| देशभरामध्ये दिवसेंदिवस अपघाताच्या प्रमाणांमध्ये वाढ होत चालली आहे. कारण की, बुधवारी आगरा लखनऊ एक्स्प्रेस वेवर बसचा भीषण अपघात झाल्यामुळे मृत्यूचा तांडव पाहिला मिळाला आहे. उत्तर प्रदेशातील लखनऊ-आग्रा एक्सप्रेस वेवर बुधवारी ओव्हरटेकच्या नादात एका बसचा भीषण अपघात झाला आहे. यामध्ये तब्बल 18 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 30 जण गंभीर जखमी आहेत. त्यामुळे मृत्यूच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, बुधवारी पहाटेच्या वेळी डबल डेकर बस बिहारच्या सीतामढी जिल्ह्यातील प्रवाशांना घेऊन दिल्लीच्या दिशेने निघाले होती. प्रवासावेळी ही बस उन्नावच्या सीमाभागात येताच तीने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नमध्ये दूध टँकरला जाऊन जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की बस थेट टँकरला कापत पुढे गेली. यामुळे ट्रॅक्टरचे आणि बसचे मोठे नुकसान झाले. या अपघातामध्ये तब्बल 18 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर अनेकजण गंभीर जखमी झाले ज्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
पंतप्रधानांकडून मदत जाहीर (Bus Accident)
या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. त्यांनी ताबडतोब प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले. दरम्यान, या अपघातानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मृतांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले आहे. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय मदत निधीतून 2 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. या जखमींना 50 हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे. या घटनेमुळे संबंधित कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सध्या सोशल मीडियावर देखील या अपघाताचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.