Saturday, June 3, 2023

लग्नासाठी निघालेल्या वऱ्हाडावर काळाचा घाला; भीषण अपघातात 4 ठार तर 6 जखमी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या बसचा भीषण अपघात झाल्याची घटना बिहार मध्ये घडली आहे. या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला असून 6 पेक्षा जास्त लोकांची प्रकृती गंभीर झाली आहे. या घटनेमुळे संपूर्ण लग्न समारंभात शोककळा पसरली आहे.

कुटुंब लग्नासाठी निघालेले असताना याच दरम्यान, एका भरधाव स्कॉर्पिओ कारनं ओव्हरटेक करण्याच्या नादात लग्नाचं वऱ्हाड घेऊन निघालेल्या बसला समोरासमोरच जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती, की वाहनांचा चक्काचूर झाला. अपघातानंतर स्कॉर्पिओमधील मृत्यू झालेले प्रवासी आतमध्ये अडकले होते. त्यांना बाहेर कसं काढायचं, असा प्रश्न पोलिसांनी पडला होता.

या अपघाताचे प्रत्यक्षदर्शी असलेल्या हरेंद्र यादव यांनी म्हटलंय, की चार जणांचा या अपघातात जागीच जीव गेला. तर जखमींना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अपघातातील मृतांमध्ये चारही जण हे पुरुष असून त्यांची ओळख पटवण्याचं काम सुरु असल्याची माहिती देण्यात आली आहे.