ताम्हिणी घाटात धोकादायक वळणावर बसचा भीषण अपघात; 5 लोक जागीच ठार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | दररोज कितीतरी अपघाताच्या बातम्या समोर येत असतात. अशातच आता एक भयानक अपघाताची बातमी समोर आलेली आहे. ती म्हणजे ताम्हिणी घाटाजवळ एक भयंकर अपघात झालेला आहे. धोकादायक वळणावर बस दरीत कोसळून हा अपघात झालेला आहे. ताम्हिणी घाटामध्ये अनेक धोकादायक अशी वळणे आहेत. या रस्त्यावरच बस दरीमध्ये कोसळली आहे. या अपघातात जवळपास 12 ते 13 प्रवास गंभीर जखमी झालेले आहेत. ही बस चाकण येथून महाडला लग्नासाठी जात होती. शुक्रवारी म्हणजेच 20 डिसेंबर रोजी सकाळच्या सुमारास हा अपघात घडलेला आहे. या बसमध्ये एकूण 40 प्रवासी असल्याची माहिती समोर आली आहे.

या बस अपघातात एकूण 5 लोकांचा मृत्यू झालेले आहेत. यातील तीन महिला आणि दोन पुरुषांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आलेले आहे. तर अजूनही दोन मृतदेह हे बसमध्ये अडकलेले आहे. त्याचप्रमाणे मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. या ठिकाणाच्या अपघाताची माहिती मिळताच माणगाव पोलीस निरीक्षकांनी त्यांच्या टीमसह घटनास्थळी धाव घेतली आणि बचाव कार्य सुरू केले. तसेच रेस्क्यू टीम आणि वैद्यकीय मदत देखील घटनास्थळी पोहोचलेली आहे. जखमींना लवकरात लवकर उपचार मिळावे, यासाठी प्रशासनाचे प्रयत्न देखील चालू झालेले आहेत.

ताम्हिणी घाट धोकादायक वळणांसाठी ओळखला जातो. या भागात रस्त्याची अवस्था देखील तितकीशी चांगली नाही. त्यामुळे या भागात अनेक वेळा अपघात घडत असतात. परंतु आत्ता झालेल्या अपघाताचे कारण अजूनही नीट स्पष्ट झालेले नाही. परंतु स्थानिक प्रशासन या अपघाता मागचे कारण शोधून बचाव कार्य करण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहे.