औरंगाबाद प्रतिनिधी | दुचाकीवर भरधाव वेगात जाणाऱ्या मित्रांसमोर बस आली दरम्यान नियंत्रण सुटल्याने दुचाकी बसखाली गेली.व मागील टायर खाली चिरडल्याने एका मित्राचा मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला त्यावर उपचार सुरू आहे. ही घटना आज पहाटे पावणे सहाच्या सुमारास वाळूज औधोगिक नगरीतील जयभवांनी चौकात घडली. कुणाल रमेश रावनकर असे अपघातात मृत्यू पावलेल्या 16 वर्षीय अल्पवयीन दुचाकीस्वाराचे नाव आहे. तर दशरथ रामचंद्र मुटठे असे गंभीरपणे जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे.
कुणाल आणि दशरथ दोघेही चांगले मित्र होते. ते दोघेही आज पहाटे पावणे सहा वाजेच्या सुमारास एम.एच.20 ए.डब्ल्यु4497 या क्रमांकाच्या दुचाकीवरून जात होते. कुणाल गाडी चालवत होता तर दशरथ पाठीमागे बसला होता, त्यांच्या गाडीचा वेगही चांगलाच होता. दरम्यान काही अंतरा पुढे त्यांच्या समोर कंपनी कामगाराची वाहतूक करणारी बस आली. दुचाकींचा वेग भरपूर होता.समोर बस अशा परिस्थितीत कुणाल ने दुचाकीचा पूर्ण क्षमतेने ब्रेक लावला मात्र अर्जंट ब्रेक लावल्याने दुचाकीचे टायर 20 ते 25 फूट घासत गेले व दुचाकी बस ला पाठीमागून धडकली. अपघात एवढा भीषण होता की, कुणाल बस च्या पाठीमागील टायर गेला व तर दशरथ बस ला धडकला.दोघेही रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावर पडलेले होते.
अपघात झाल्याने बघ्यांची गर्दी जमा झाली ही माहिती मिळताच वाळूज वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक शेषराव उदार यांनी घटनस्थळी गाठत दोन्ही जखमींना खाजगी वाहनातून घाटी रुग्णालयात हलविले. कुणालला त्वरित ट्रॉमा सेंटर मध्ये ऍडमिट करण्यात आले मात्र काही वेळातच उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला तर कुणाल चा मित्र दशरथ हा गंभीररीत्या जखमी असून त्यावर उपचार सुरू आहे.पोलिसांनी अपघातग्रस्त वाहन आणि दुचाकी ताब्यात घेतली आहे.या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’