चक्क एस.टी. बसमध्ये साजरी केली शिवजयंती ; शिवभक्त चालकाची अनोखी शिवभक्ती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | आता एक आगळी शिवजयंती… शिवजयंती साजरी करत असताना चौकात सभागृहात, गड-किल्ल्यांवर लगबग सुरू आहे, ही शिवजयंती आपण कायमच पाहतो मात्र आज शिवजयंती पाहणार आहोत एसटीतील कराड कोल्हापूर मधील संभाजीनगर आगारातील शिवप्रेमी चालक बाळासाहेब कांबळे यांनी एसटीतच शिवाजी महाराजांची प्रतिमा लावून त्याचे पूजन केले. आज शिवजयंती असलीतरी सुट्टी नसल्याने शिवजयंती साजरी करता येणार नव्हती. मग बाळासाहेब चालक म्हणून ड्युटीवर असणाऱ्या कोल्हापूर – महाबळेश्वर एस टीतच शिवजयंती साजरी केली. लालपरीत साजरी झालेली आगळी शिवजयंती सर्वांना भावली.

बाळासाहेब कांबळे म्हणाले की मागच्या वर्षी शिवजयंती दिवशी मी 1000 पुस्तकांचे वाटप केले होते. छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्यासाठी आराध्य दैवत आहेत. शिवाजी महाराज होते म्हणून हा महाराष्ट्र घडला आहे. आणि त्यांचा हा इतिहास जागृत ठेवण्यासाठी बस मध्ये शिवजयंती साजरी करावी अस मला वाटले अस ते म्हणाले.

हा उपक्रम मी गेली अनेक वर्षे करत असून गाडीत वाचनालय आहे तसेच शिवाजी महाराजांची अनेक पुस्तके आहेत, राजेंचा हा इतिहास जागृत राहावं म्हणूज मी प्रयत्न करतोय असे चालक बाळासाहेब कांबळे म्हणाले. तसेच एसटी ही महाराष्ट्राची रक्तवाहिनी असून सर्वांचे सहकार्य लाभतय असेही त्यांनी म्हंटल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment