मध्यवर्ती बसस्थानकावर होणार बसपोर्ट; मनपाकडून 1 कोटी 62 लाखांची शुल्कमाफी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे शहरातील मध्यवर्ती बस स्थानक उभारण्यासाठी मनपाकडून आकारण्यात आलेले 1 कोटी 62 लाख रुपयांचे विकास शुल्क माफ करण्यात आले आहे. या शुल्क माफीच्या संचिकेवर मनपा प्रशासक तथा आयुक्त आस्तिक कुमार पाण्डेय यांनी स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे या निर्णयामुळे मध्यवर्ती बस स्थानकाच्या जागेवर नवीन बसपोर्ट उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

एसटी महामंडळाने मध्यवर्ती बस स्थानक पाडून त्याजागी नवीन बस पोर्ट उभारण्यासाठी निविदा अंतिम करून बांधकाम परवानगीसाठी मनपाकडे प्रस्ताव सादर केला होता. मनपाने बांधकाम परवानगी देण्यापूर्वी विकास शुल्कापोटी 1 कोटी 62 लाख रुपये भरण्यासंदर्भात एसटी महामंडळाला पत्र पाठवले होते. मात्र एसटी महामंडळाने विकास सुरू व्हावा अशी मागणी केली होती. दरम्यान मनपाने मुकुंदवाडी येथील एसटी महामंडळाच्या कार्यशाळेची जागा स्मार्ट सिटी बस डेपो साठी मागितली होती.

यासंदर्भात मुंबई येथे पालक मंत्री सुभाष देसाई व परिवहन मंत्री अनिल परब यांच्या उपस्थितीत वरिष्ठ अधिकाऱ्यांची नुकतीच बैठक झाली या बैठकीत विकास शुल्क माफी व बस डेपोसाठी जागा देण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा झाली. त्यानंतर परिवहन मंत्री अनिल परब हे काही दिवसांपूर्वी शहरात आले असता मनपाच्या विकास सुरू माफी सह मुकुंदवाडी येथील जागा सिटी बस डेपो गती देण्यासंदर्भात यांच्या उपस्थितीत बैठकीत चर्चा झाली. यावेळी मनपाने विकास शुल्क माफी द्यावी एसटी महामंडळाने सिटी बस डेपो साठी लीजवर जागा देण्यासंदर्भात परिवहन मंत्री अनिल परब यांनी आदेश दिले. त्यानुसार मध्यवर्ती बस स्थानक वर नवीन पासपोर्ट काढण्यासाठी मनपाकडून वापरलेले 1 कोटी 62 लाख रुपयांचे विकास शुल्क माफ करण्यात आले आहे.

Leave a Comment