व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

Business Idea: कमी खर्चात ‘या’ व्यवसायाद्वारे मिळवा भरपूर पैसे; कमी खर्चात जास्त नफा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अनेकजण व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असतात मात्र कमी खर्चात जास्त नफा मिळवण्यासाठी काय करावे हेच त्यांना समजत नाही. तर अशा लोकांना आज आम्ही वेफर्सच्या व्यवसायाविषयी माहिती देणार आहोत. वेफर्सच्या व्यवसायासाठी जास्त खचर्ही येत नाही की त्यासाठी मोठी जागाही लागत नाही. Business Idea

वेफर्स हे फक्त बटाटेच नाही तर केळी, गाजर, रताळे, बीट, आणि पपईपासून देखील बनवले जातात. तसेच वेफर्सला बाजारपेठेत बारमाही मोठी मागणी देखील असते. अद्याप या व्यवसायात फार मोठ्या कंपन्या उतरलेल्या नाहीत त्यामुळे तुमची स्पर्धा फक्त स्थानिक उत्पादकांशी असेल. जर तुमच्या वेफर्सची टेस्ट आणि क्वालिटी चांगली असेल तर तुम्हांला भरपूर नफा मिळवण्यापासून कोणीही अडवू शकणार नाही.

हे लक्षात घ्या कि, सुमारे 100 किलोपर्यँत वेफर्स तयार करण्यासाठी 5 ते 7 हजार रुपयांचा खर्च येतो. मात्र अनेकवेळेला भाजीपाला, फळभाज्यांच्या किंमतीत वाढ झाल्याने खर्च वाढू देखील शकतात. 100 किलोचे हे वेफर्स बाजारात 15,000 रुपयांपर्यंत विकले जाऊ शकतात. जर तुम्ही एका दिवसात 50-60 किलो वेफर्स बनवत असाल तर तुम्हांला दररोज 7,500-8,500 रुपये नफा मिळू शकेल. सर्व खर्चानंतरही तुम्हाला दररोज 5,000-6,000 रुपयांचा नफा मिळू शकतो.

अशा प्रकारे सुरुवात करता येईल
तुम्ही ते स्वतःच्या घरातही सुरु करू शकाल. मात्र, जर तुम्हाला एखादी कंपनी सुरू करायची असेल तर त्यासाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता करावी लागेल. जसे कि, व्यवसायाची नोंदणी, जीएसटी रजिस्ट्रेशन आणि इतर आवश्यक गोष्टी. यानंतर तुम्हाला बटाटा, गाजर, बीट इत्यादी कच्चा माल लागेल. तसेच भाज्या कापण्यासाठी, धुण्यासाठी, मिक्स करण्यासाठी मशिनची गरज असेल. याशिवाय पॅकेजिंग आणि प्रिंटिंगसाठी मशीन्सही घ्यावे लागतील.