हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Business idea : जर आपल्यालाही शेतीमध्ये रस असेल आणि कमी वेळात शेतीतून चांगला नफा मिळवायचा असेल तर स्ट्रॉबेरीची शेती हा एक उत्तम पर्याय ठरू शकेल. आजकाल भारतातील स्ट्रॉबेरीची मागणी भरपूर वाढली आहे. पूर्वी फक्त महानगरांमध्ये असणारी मागणी आता छोट्या शहरांमध्येही वाढू लागली आहे. हे लक्षात घ्या कि, स्ट्रॉबेरीच्या एक एकर पिकातून आपल्याला 6 लाख रुपयांपर्यंतचा नफा मिळू शकतो.
जर आपण एखाद्या महानगराजवळ राहत असाल तर स्ट्रॉबेरीच्या लागवडीतून जास्त नफा मिळू शकेल. कारण मोठ्या शहरांमध्ये जास्त मागणी असल्याने त्याचे दर देखील जास्त असतात. पूर्वी त्याची लागवड फक्त डोंगराळ भागातच केली जात असे. मात्र या शेतीतून मिळणाऱ्या भरघोस उत्पन्नामुळे मैदानी भागातही त्याची लागवड सुरू झाली आहे. Business idea
स्ट्रॉबेरीची लागवड कशी करावी ???
स्ट्रॉबेरीच्या लागवडीसाठी वालुकामय चिकणमाती सर्वांत चांगली मानली जाते. जर योग्य सुपीक जमिन असेल वालुकामय जमिनीतही त्याची लागवड करता येते. ज्या जमिनीमध्ये पाणी साठून राहते अशा जमिनीवर स्ट्रॉबेरीची लागवड कधीही करू नये. स्ट्रॉबेरीची लागवड करण्यासाठीची योग्य वेळ सप्टेंबर नंतर असते. त्याची लागवड बहुतेक करून पावसाळा संपल्यानंतर ऑक्टोबरमध्येच केली जाते. Business idea
मल्चिंग आणि ठिबक सिंचन
मेडवर स्ट्रॉबेरीची लागवड केली जाते. चांगले उत्पादन मिळण्यासाठी प्लॅस्टिकचे मल्चिंग करून त्यावर झाडे लावावीत. मल्चिंग म्हणजे संपूर्ण मेड प्लॅस्टिकने झाकले जाते आणि नंतर जिथे रोप लावायचे आहे तिथे छिद्र केले जातात. या तंत्रामध्ये झाडांना पाणी देण्यासाठी ठिबक सिंचन पद्धतीचा वापर केला जातो. यामध्ये प्लॅस्टिक सीट कव्हर असल्यामुळे गवत वाढत नाही आणि ओलावाही बराच काळ टिकून राहतो, ज्यामुळे पाण्याची गरज देखील कमी होते. स्ट्रॉबेरीची रोज नियमितपणे स्वच्छ करावी लागतात. तसेच फळे काढणीच्या वेळी कोणतीही अडचण येऊ नये म्हणून कोरडी पाने वेळोवेळी काढून टाकावी लागतात. Business idea
किती खर्च येईल ???
स्ट्रॉबेरीची शेती करण्यासाठी खूप खर्च येतो. यामध्ये एक एकरवर स्ट्रॉबेरीची लागवड करण्यासाठी किमान 6 लाख रुपये खर्च होतात. स्ट्रॉबेरीची रोपे खूप महाग असतात. तसेच मल्चिंगसाठी प्लॅस्टिक लावावे लागतात. ते देखील खूप महाग असतात. याशिवाय स्ट्रॉबेरी पॅकिंगसाठी येणाऱ्या काड्या, ट्रे यांची किंमतही जास्त असते. Business idea
किती नफा मिळेल ???
स्ट्रॉबेरीच्या लागवडीतून चांगले उत्पन्न देखील मिळते. तसेच योग्य हवामान असेल आणि स्ट्रॉबेरीची योग्य काळजी घेतली गेली तर एक एकर शेतातुन किमान 12 लाख रुपये किंमतीची स्ट्रॉबेरी घेता येते. अशा प्रकारे सहा महिन्यांत एक एकरमध्ये स्ट्रॉबेरीची लागवड केल्यास सहा लाख रुपयांपर्यंतचा नफा मिळू शकतो.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.mudra.org.in/
हे पण वाचा :
Multibagger Stock : ‘या’ शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना दिला तब्ब्ल 2000% रिटर्न !!!
FD Rate : SBI ग्राहकांसाठी चांगली बातमी, बँकेने FD वरील व्याजदर वाढवले
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतींमध्ये घसरण, आजचे नवीन दर पहा
Bank FD : ‘या’ बँकाकडून टॅक्स सेव्हिंग FD वर मिळत आहे सर्वाधिक व्याज !!!
Jio च्या ‘या’ प्लॅन्समध्ये 3GB डेटासह मिळणार Disney Plus Hotstar चे फ्री सब्सक्रिप्शन !!!