Business Idea : अत्यंत कमी खर्चात ‘हा’ व्यवसाय सुरू करून मिळवा भरपूर पैसे !!!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Business Idea : असं म्हंटल जातं कि जोड्या या स्वर्ग लोकीचे ठरलेल्या असतात. मात्र त्याची औपचारिकरता ही पृथ्वीवर पूर्ण होते. आधी अशी कामं मध्यस्थांच्या मदतीने घरातील वडीलधारी मंडळी करत असत. या मध्यस्थांना वधू-वराच्या दोन्ही बाजूची चांगली माहीती असायची. मात्र, बदलत्या काळात लग्न जमवण्याची पद्धतही बदलत गेली. आता या मध्यस्थांची जागा मॅरेज ब्युरोने घेतली आहे.

Sujatha Marriage Bureau, Dilsukhnagar - Matrimonial Bureaus in Hyderabad -  Justdial

जर आपल्याकडेही 2 घरांना एकत्र करण्याची कला असेल तर मॅरेज ब्युरोचा व्यवसाय करता येईल. यामध्ये फारशी गुंतवणूक देखील करावी लागत नाही.. तसेच एकदा स्थिरावला आणि कॉन्टॅक्ट तयार झाले की यामध्ये चांगला नफा देखील होतो. Business Idea

मॅरेज ब्युरो नक्की काय असते ???

मॅरेज ब्युरो ला आपण आधुनिक मध्यस्थ म्हणू शकता. हे ब्युरो दोन्ही पक्षांना मुलगा किंवा मुलीच्या संबंधित सर्व माहिती देतात. त्यांच्याकडे अनेक पर्याय उपलब्ध असतात. जे ते दोन्ही कुटुंबांना दाखवतात. मात्र एकदा लग्न ठरले की ते दोन्ही पक्षांकडून कमिशन घेतात.हाच त्यांचा मुख्य उत्पन्नाचा स्रोत आहे. Business Idea

Vadsbiz - Dds Marriage Bureau ::

कसे सुरू करता येईल ???

मॅरेज ब्युरो सुरू करण्यासाठी मोठ्या जागेची देखील गरज नाही. ते 1 रूम आणि हॉलद्वारे देखील सुरू करता येईल. तसेच ऑफिसमध्ये कामासाठी फार फार तर 2 लोकं लागतील. एक रिसेप्शनिस्ट म्हणून तर दुसरा जो ग्राहकांना रिफ्रेशमेंट्स वगैरे देतील. आपल्या ऑफिसमध्ये 4-6 लोकं बसतील इतकी जागा असावी. सुरुवातीला, आपल्याकडे भरपूर पर्याय नसले तरीही काही अडचण येणार नाही. नंतर वेळ काढून आपण लोकांच्या आवडी प्रमाणे जुळवाजुळव करून त्यांना कळवू शकाल. कालांतराने आपल्या क्लायंटची लिस्ट वाढेल. Business Idea

खर्च आणि उत्पन्न किती असेल ???

या कामासाठी फारसा खर्च देखील येत नाही. तुजर आपण ते घरातूनच सुरू करत असाल तर भाड्याचे पैसे वाचतील. यानंतर आपल्या 2 कर्मचाऱ्यांची सॅलरी आणि वीज बिल यासारख्या काही गोष्टींचा मासिक खर्च पाहावा लागेल. तसेच, या व्यवसायाच्या नोंदणीसाठी काही रक्कम आकारली जाईल. हा व्यवसाय 50,000-1,00,000 लाख रुपयांच्या गुंतवणुकीसह सुरू करता येईल. उत्पन्नाबद्दल बोलायचे झाले तर आपल्याला ब्युरोसाठी 500 ते 2500 रुपयांपर्यंत रजिस्ट्रेशन फी घेता येईल. ज्याची किंमत असू शकते. यानंतर, विवाह निश्चित झाल्यावर दोन्ही पक्षांकडून कमिशन मिळावे लागते. हे कमिशन 5 हजार ते 50 हजार रुपयांपर्यंत असू शकते.Business Idea

Best Punjabi Marriage Bureau & Matrimonial Services In Delhi

मार्केटिंग

या व्यवसायासाठी वेबसाइट देखील तयार करता येईल. तसेच पेपर आणि चॅनेलमध्ये जाहिरात देखील देता येईल. सोशल मीडिया सारखे आणखीही काही मार्ग आहेत ज्याद्वारे आपल्याला जाहिरात करून जास्तीत जास्त ग्राहकांना आकर्षित करता येईल. Business Idea

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.justdial.com/Pune/Matrimonial-Bureaus/nct-10314403

हे पण वाचा : 

Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ, नवीन दर पहा

PNB ग्राहकांना खुशखबर!! FD वरील व्याजदरात वाढ

Maruti Suzuki Brezza 2022 : मारुती सुझुकीने लॉंच केली नवी Brezza; पहा वैशिष्ट्य आणि किंमत

Gold Investment : जोखीम असूनही सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याछा सल्ला तज्ज्ञ का देतात??? जाणून घ्या

Jio च्या 22 रुपयांच्या ‘या’ प्लॅनमध्ये मिळणार महिनाभर इंटरनेट !!!

Leave a Comment