हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Business Ideas : जर आपल्याला कमी गुंतवणुकीतून एखादा व्यवसाय सुरू करायचा असेल तर आपण मोबाईल-लॅपटॉप रिपेअरिंग सेंटर सुरु करू शकता. सध्याच्या काळात मोबाईल आणि लॅपटॉप हे गरजेचे झालेआहेत. त्याबरोबरच फास्ट इंटरनेटमुळे देशात अनेक ऑनलाइन सेवा देखील वेगाने विस्तारत आहेत. यामुळेच कधीकाळी फक्त ऑफिसमध्ये दिसणारा लॅपटॉप आता प्रत्येक घराघरात पोहोचला आहे. अशा या लॅपटॉप आणि मोबाईलच्या वाढत्या ट्रेंडमुळे ते दुरुस्त करणाऱ्यांची मागणी देखील वाढत आहे.
मात्र हे लक्षात घ्या कि, लॅपटॉप आणि मोबाईल रिपेअरिंग करणे हे एक कौशल्याचे काम आहे. त्यामुळे हा व्यवसाय सुरू करण्यापूर्वी त्याबद्दलची सर्व माहिती आणि ते रिपेअर करण्याचे स्किल आपल्याकडे असायला हवे. म्हणूनच हा व्यवसाय सुरू करण्याआधी लॅपटॉप आणि मोबाईल रिपेअरिंगचा कोर्स करणं फार महत्वाचं ठरेल. देशातील अनेक संस्थांमध्ये याचे ट्रेनिंग दिले जाते. याशिवाय हे काम ऑनलाइन देखील शिकता येईल. Business Ideas
अशा प्रकारे करा सुरुवात
जेव्हा आपण लॅपटॉप आणि मोबाईल रिपेअरिंगमध्ये पारंगत व्हाल तेव्हाच स्वतःचे रिपेअरिंग सेंटर सुरु करा. तसेच लोकांना सहजासहजी पोहोचता येईल अशा ठिकाणीच लॅपटॉप रिपेअरिंग सेंटर उघडायला हवे. यामुळे आपल्याला ग्राहक वाढवण्यास मदत होईल. यासाठी सुरुवातीला जास्त सामान ठेवण्याची गरज नाही. कारण, इथे आपल्याला फक्त खराब झालेली उपकरणेच दुरुस्त करायची आहेत, त्यामुळे फार फार तर मदर बोर्ड, प्रोसेसर, रॅम, हार्ड ड्राईव्ह आणि साउंड कार्ड यासारखे काही आवश्यक असलेले हार्डवेअरच ठेवावे लागतील. Business Ideas
खर्च आणि कमाई किती असेल ???
यासाठी सुरुवातीला 2 ते 4 लाख रुपयांची गुतंवणूक करता येईल. नंतर जसजसे काम वाढेल तसतशी गुंतवणूकही वाढवता येईल. लॅपटॉप आणि मोबाईलच्या दुरुस्ती व्यतिरिक्त आपल्याला याची विक्री देखील करता येईल. यांच्या दुरुस्तीसाठीचे शुल्क खूप जास्त असते त्यामुळे या व्यवसायातून चांगले पैसे मिळू शकतील. एकदा या व्यवसायात हात बसला कि आपल्याला लाखोंची कमाई मिळू शकेल. Business Ideas
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.mudra.org.in/
हे पण वाचा :
SIP : 500 रुपयांच्या नियमित गुंतवणुकीने लाखो रुपयांचा फंड कसा तयार करावा हे समजून घ्या
LPG गॅस कनेक्शन घेण्यासाठी आता मोजावे लागणार जास्त पैसे !!!
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात किंचित वाढ, आजचे नवीन दर पहा
Bank FD : ‘या’ बँकाकडून टॅक्स सेव्हिंग FD वर मिळत आहे सर्वाधिक व्याज !!!
Multibagger Stock : ‘या’ शेअर्सने गुंतवणूकदारांना 1 महिन्यात दिला अडीच पट नफा !!!