हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Business Loan) देशभरातील अनेक तरुण मंडळी नोकरीऐवजी स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यास इच्छुक असतात. आपल्या बुद्धिमत्तेचा आणि कलागुणांचा वापर करून एक चांगला उद्योजक होण्याची धडपड करणाऱ्या या तरुणांना केंद्र सरकार प्रोत्साहन देते. स्वयंरोजगाराला चालना देता यावी म्हणून केंद्र सरकारमार्फत विविध योजना देखील राबवल्या जातात. ज्यांच्या माध्यमातून व्यवसाय क्षेत्रात प्रगती करू पाहणाऱ्या तरुण उद्योजकांना केंद्र सरकार मदत करते. यांपैकी एक लाभदायी योजना म्हणून प्रधानमंत्री मुद्रा योजनेकडे पाहिले जाते. या योजनेअंतर्गत केंद्र सरकार स्वस्तात १० लाखांपर्यंतचे कर्ज मंजूर करते. चला तर या योजनेविषयी अधिक माहिती घेऊया.
प्रधानमंत्री मुद्रा योजना (Business Loan)
सरकारची प्रधानमंत्री मुद्रा योजना ही एक अशी योजना आहे जिच्या माध्यमातून केंद्र सरकार १० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज कोणत्याही हमीशिवाय देते. तसेच यावर व्याजदर देखील अत्यंत कमी आकारला जातो. ग्रामीण भागात बिगर कॉर्पोरेट लघुउद्योग सुरू करण्यासाठी किंवा विस्तार करण्यासाठी या योजनेतून कर्ज दिले जाते. ज्यामुळे स्वतःचा व्यवसाय सुरु करू पाहणाऱ्या तरुणांसाठी ही योजना अत्यंत लाभदायी ठरते.
प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा लाभ कोण घेऊ शकतं?
प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा लाभ केवळ भारतीय नागरिक घेऊ शकतात. ज्यांच्याकडे बिगर शेतकरी उत्पन्न निर्माण करण्याच्या व्यवसायाची योजना आहे. (Business Loan) उदाहरण द्यायचं तर, उत्पादन / प्रक्रीया / व्यापार किंवा सेवा क्षेत्रातील कोणताही उद्योग व्यवसाय. ज्यासाठी १० लाख रुपयांपर्यंत रकमेची गरज असेल.
प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत कोणकोणती कर्ज दिली जातात?
प्रधानमंत्री मुद्रा योजनेमार्फत दिल्या जाणाऱ्या कर्जाची एकूण ३ श्रेणींमध्ये विभागणी करण्यात आलेली आहे. यामध्ये शिशु कर्ज, किशोर कर्ज आणि तरुण कर्ज यांचा समावेश आहे. २०१५ साली सुरु झालेल्या या योजनेअंतर्गत एकूण २३.२ लाख कोटी रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले आहे. त्यानुसार, शिशु कर्जाअंतर्गत ५०,००० रुपये, किशोर कर्जाअंतर्गत ५०,००० रुपये ते ५ लाख रुपये आणि तरुण कर्जाअंतर्गत ५ लाख रुपये ते १० लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाते. (Business Loan)
मुख्य बाब म्हणजे, शिशू मुद्रा कर्ज योजनेअंतर्गत कर्जासाठी अर्ज करायचा असेल तर कोणत्याही गॅरेंटरची गरज लागत नाही. तसेच कोणतेही शुल्कसुद्धा भरावे लागत नाही. मात्र, वेगवेगळ्या बँकांमध्ये कर्जाच्या व्याजदरात तफावत असण्याची शक्यता असते.
प्रधानमंत्री मुद्रा कर्जासाठी अर्ज कसा करावा?
प्रधानमंत्री मुद्रा कर्जासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आहे. यासाठी तुम्हाला तुमच्या जवळील किंवा कोणत्याही बॅंकेतच्या शाखेला भेट द्यावी लागेल. (Business Loan) याशिवाय कर्जदार Udyamimitra पोर्टलवर (www.udyamimitra.in) MUDRA कर्जासाठी अगदी घरबसल्या देखील ऑनलाइन अर्ज दाखल करू शकतात.
प्रधानमंत्री मुद्रा कर्जासाठी कोणकोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?
- ओळखीचा पुरावा – मतदान ओळख पत्र, आधार कार्ड इ.
- रहिवासी पुरावा – लाईट बिल/ घर पावती.
- आपण जो व्यवसाय करणार आहोत किंवा करत आहोत त्याचा परवाना व स्थायी पत्ता.
- व्यवसाय योजना, त्यासाठी लागणारे मटेरियल किंवा यंत्र सामुग्री इ.
- आपण ज्या व्यापाऱ्याकडून माल घेतला त्याचे पुर्ण नाव व पत्ता. (Business Loan)