‘रामराज्य’ कि ‘कोरोना साम्राज्य’! रस्त्यावर पडलेले २५ हजार रुपये कोणीच उचलले नाही

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बिहार । भारतात रामराज्य परत आलंय. तुम्ही म्हणालं कसं? जवळपास २५ हजार रुपयांचं बंडल रस्त्यावर पडलेलं असताना कोणीही त्याला हात लावला नाही. तुम्ही म्हणाल हे कसं काय शक्य आहे? हे कलियुग आहे १ रुपया जरी रस्त्यावर कोणाला दिसला तरी लोक चटकन लक्ष्मीचं वरदान समजून खिशात टाकतात आणि इथे तर २५ हजार आहेत. पण असं खरचं घडलं आहे. बिहार राज्यात अशीच एक घटना घडल्याचं वृत्त ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलं आहे.

रस्त्यावर २५ हजाराचा पडले असताना त्याला कोणीही हात लावला नाही. आणि ज्या व्यक्तीच्या खिशातून हे २५ हजार रुपये रस्त्यावर पडले, ते त्याला सुखरुप परत मिळाले आहेत. हा रामराज्य पुन्हा आल्याचा अनुभव रामानंद सागर यांच्या टीव्हीवर पुन्हा प्रसारित झालेल्या रामायण या मालिकेमुळे कदाचित आला असं आपण म्हणू. पण खरं तर देशातील कोरोनाच्या विषाणूरुपी राक्षसानं जे थैमान घातलं आहे. त्या भीतीनं रस्त्यावरचे पैसे उचलायला कोणी धजावत नाही आहे.

‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार गजेंद्र शाह या व्यावसायिकाच्या खिशातून नोटांची बंडल रस्त्यावर पडली होती. “माझ्या खिशातून काहीतरी काढत असताना २५ हजार रुपयांची बंडल रस्त्यावर पडली. मला ती नोटांची बंडल जशीच्या तशी परत मिळाली. कारण करोना व्हायरसच्या भीतीमुळे त्याला कोणीच हात लावण्याची हिंमत करू शकला नाही. एका सज्जन व्यक्तीने पोलिसांना फोन केला आणि ती रक्कम उचलण्यास सांगितली,” असं गजेंद्र शाह म्हणाले. मधेपुरा जिल्ह्यात ही घटना घडली.

‘रस्त्यावर पडलेलं नोटांचं बंडल पाहून काही लोक जमा झाले होते, पण त्याला हात लावण्याचं धैर्य कोणालाच होत नव्हतं. करोना व्हायरसची दहशत लोकांमध्ये होती. त्यामुळे त्यातल्या एकाने किशनगंज पोलीस ठाण्याला फोन करत ही बाब सांगितली’, अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी सर्व खातरजमा केल्यानंतर गजेंद्र यांना त्यांचे पैसे परत केले. दरम्यान, नोटांच्या माध्यमातून कोरोना फैलाव करण्याचा प्रयन्त केला जात असल्याच्या अनेक अफवा सध्या उडत आहेत त्यामुळे रस्त्यावर पडलेले पैसे कोणी उचलले नाहीत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment