व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

दिग्गज उद्योगपती राहुल बजाज यांचे निधन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन |  बजाज ग्रुपचे सर्वेसर्वा आणि ज्येष्ठ उद्योगपती राहुल बजाज यांचं आज पुण्यात निधन झालं. ते ८३ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते कर्करोगाने त्रस्त होते. बजाज या उद्योग समूहाला वाहन उद्योगात मोठं करण्यात राहुल बजाज यांचा मोठा वाटा होता.

राहुल बजाज हे भारतीय अब्जाधीश आणि प्रसिद्ध उद्योगपती होते. ते बजाज समूहाचे चेअरमन होते. त्यांचा जन्म 10 जून 1938 रोजी झाला होता. 2001 मध्ये त्यांना तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मभूषण प्रदान करण्यात आला होता.

राहुल बजाज यांनी हॉवर्ड विद्यापीठातून ‘एमबीए’चेही शिक्षण घेतले. राहुल बजाज हे १९६८ मध्ये बजाज ऑटोमध्ये कार्यकारी अधिकारी या पदी रुजू झाले. बजाज या उद्योग समूहाला वाहन उद्योगात मोठं करण्यात राहुल बजाज यांचा मोठा वाटा आहे.

गेल्या वर्षी राहुल बजाज यांनी बजाज ऑटोच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. पाच दशकांपासून त्यांनी बजाज ऑटोची धुरा यशस्वीरित्या सांभाळली होती. बजाज ऑटोला आघाडीवर नेण्यात राहुल बजाज यांना महत्त्वाचा आणि मोलाचा वाटा होता. राहुल बजाज यांच्यानंतर ६७ वर्षीय नीरज बजाज यांच्याकडे बजाज ऑटोच्या अध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली होती.