धुळोबा डोंगरावर ट्रेकिंग करताना व्यावसायिक सुहास पाटील यांचा मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड | कराडातील सायकलपट्टू व उत्तम ट्रेकर, गुळाचे अडत व्यापारी सुहास श्यामराव पाटील (वय- 52) यांचे घारेवाडीचा धुळोबा डोंगरात ट्रेकींग करताना ह्रदयविकाराच्या धक्याने मृत्यू झाला आहे. रविवारी दि. 17 रोजी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही दुर्देवी घटना घडली.

घारेवाडी येथे असलेला धुळोबा डोंगरावर सात ट्रेकर्स जात होते. यावेळी सुहास पाटील यांना ह्रदयाचा तीव्र धक्का बसला. त्यांच्या सोबतच्या ट्रेकर्सनी प्रंसगवाधन राखून त्यांना डोंगरातून खाली आणले. शहरातून मदतीला आलेल्या ट्रेकर्सच्या मदतीने सुहास पाटील यांना रूग्णालयात हलवले, मात्र रूग्णालयात दाखल करण्यापूर्वीच श्री. पाटील यांचे निधन झाले.

सुहास पाटील हे मार्केट यार्डातील गुळाचे अडत व्यापारी म्हणून शहरात प्रसिद्ध होते. उत्तम ट्रेकर्स व सायकलीस्ट म्हणून ते शहरात परिचित होत. त्यांनी वैष्णवेदेवी ते श्रीखंड कैलास सायकलींगने प्रवास केला आहे. नवरात्रीत साकलवरून कोल्हापूरला ते आंबाबाईच्या दर्शनालाही जावून आले होते. त्यांनी परिसरातील अनेक गड व डोगरातही ट्रेकींग पूर्ण केले आहे. त्यासह कराड ते वैष्णोदेवी व पुन्हा कराड अशी चालत परिक्रीमा यात्रा यशस्वी पूर्ण केली होती. कराड ते रायगड, कराड ते कोल्हापूर सायकल ट्रेकही पूर्ण केला आहे. श्रीखंड कैलास खडतर यात्रा यशस्वीरीत्या पूर्ण केला. आज सकाळी धुळोबा डोंगरात ट्रेकिंगच्या दरम्यान त्यांना ह्रदयविकाराचा धक्का बसल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे समजताच शहरात व्यापारी व ट्रेकर्सना धक्का बसला.

Leave a Comment