Bussiness Idea | आजकाल अनेक तरुण असे आहेत. ज्यांना नोकरी करण्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय करण्यात जास्त रस आहे. काही तरुण तर त्यांच्या नोकऱ्या सोडून व्यवसाय सुरू करत आहेत. परंतु केवळ शिकलेल्या लोकांनाच हा व्यवसाय करता येईल. असा अनेक लोकांचा समज असतो. परंतु असे अनेक व्यवसाय आहेत, जे एखाद्या गृहिणीला देखील घरी बसून चालू करता येईल. तुम्ही देखील असाच एखादा घरी बसून अगदी कमी बजेटमध्ये तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल, तर आजची ही बातमी तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. कारण आज आम्ही तुम्हाला अशा टॉप व्यवसायांबद्दल सांगणार आहोत. ज्यात जे तुम्ही घरी बसून देखील चालू करू शकता आणि केवळ 10 ते 20 हजार रुपये गुंतवणूक करून तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता. (Bussiness Idea)
आज आम्ही तुम्हाला अगरबत्ती आणि मेणबत्तीचा व्यवसायाबद्दल सांगणार आहोत. अगरबत्ती तर आजकाल रोज देवापुढे लावतात. त्याचप्रमाणे सणासुदीच्या वेळी देखील मेणबत्तीना मोठ्या प्रमाणात मागणी असते. आता आपण या दोन्ही व्यवसायांबद्दल माहिती जाणून घेऊया. हे व्यवसाय चालू करण्यासाठी कोणते सामान लागते. त्याचप्रमाणे त्याला किती खर्च येईल हे देखील जाणून घेऊया.
अगरबत्ती बनवण्याचा व्यवसाय | Bussiness Idea
मंदिरात दररोज देवासाठी आपण अगरबत्तीचा वापर करू करत असतो. अगरबत्तीशिवाय आपली पूजा पूर्ण होत नाही. त्यामुळे बाजारात या अगरबत्तीला नेहमी मागणी असते. अगरबत्तीचा व्यवसाय चालू करणे हा तुमच्यासाठी एक चांगला पर्याय होऊ शकतो. यात तुम्ही जास्त गुंतवणूक न करता देखील तुम्हाला चांगला फायदा मिळेल. आता यासाठी कोणते साहित्य लागते आणि त्याची किंमत काय असणार आहे हे आपण जाणून घेऊया.
अगरबत्तीसाठी साहित्य आणि किंमत
- कोळशाची धूळ 1 किलो – 13 रु
- जिगाट पावडर -1 किलो – 60 रुपये
- व्हाईट चिप्स पावडर -1 किलो – 22 रु
- चंदन पावडर – 1 किलो – 35 रु
- बांबू स्टिक – 1 किलो – 116 रु
- परफ्यूम – 1 तुकडा – 400 रु
- डीईपी – 1 लिटर – 135 रु
- पेपर बॉक्स -1 डझन – 75 रुपये
- रॅपिंग पेपर – 1 पॅकेट – 35 रु
- कुप्पम डस्ट – 1 किलो – रु ८५
मेणबत्ती बनवण्याचा व्यवसाय
मेणबत्ती बनवण्याचा व्यवसाय हा नेहमीच फायद्याचा व्यवसाय ठरला आहे. अनेक समारंभ, वाढदिवस साजरे करण्यासाठी मेणबत्तीचा वापर करतात. त्याचप्रमाणे अनेक गावांमध्ये लाईट नसल्यामुळे रात्री देखील लोक मेणबत्ती वापरतात. अशा परिस्थितीत तुम्ही मेणबत्तीचा व्यवसाय सुरू करून खूप चांगले उत्पन्न घेऊ शकता. यासाठी जास्त खर्च देखील येत नाही. आता आपण हा मेणबत्तीचा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला काय काही साहित्य लागेल आणि त्याला किती खर्च येईल याची सविस्तर माहिती पाहणार आहोत.
मेणबत्त्यांसाठी साहित्य आणि किंमत
- पॅराफिन मेण -1 किलो – 115 रु
- भांडी किंवा भांडे -1 पॅन – 250 रु
- एरंडेल तेल – 1 लिटर – ३१० रु
- मेणबत्तीचा धागा – 1 रोल – 35 रु
- विविध रंग – 1 पॅकेट – रु 85
- थर्मामीटर – 1160 रु
- परफ्यूम – 1 बाटली – 250 रु