Bussiness Idea Of Poultry Farm | आजकाल अनेक शेतकरी हे शेतीसोबत अनेक जोड व्यवसाय करत असतात. निसर्गाच्या बदलत्या चक्रामुळे आजकाल शेतकऱ्यांना शेतीतून जास्त उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे शेतकरी आणखी एक जोड व्यवसाय करतात जेणेकरून त्यांना आर्थिक स्थैर्य गाठता येईल. शेतकरी हे काही म्हशींचे पालन त्याचप्रमाणे कुक्कुटपालन यांसारखे जोड व्यवसाय करत असतात. जेणेकरून याचा त्यांच्या शेतीला देखील फायदा होईल आणि त्यांना देखील याचा आर्थिक लाभ घेता येईल. सध्या कुकूटपालन हा व्यवसाय देखील मोठ्या प्रमाणात होत आहे. कारण बाजारामध्ये सध्या कोंबडीच्या मटणाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे अगदी लहान शेतकरी देखील यामध्ये गुंतवणूक करत आहात. आता आपण अशा एका स्त्रीची कहाणी जाणून घेणार आहोत, तिने कुक्कुटपालन या व्यवसायामध्ये गुंतवणूक केली आणि ती खूप चांगला नफा मिळवत आहे.
कुक्कुटपालनाचा (Bussiness Idea Of Poultry Farm) व्यवसाय करणाऱ्या संगीता देवी या बिहार राज्यातील बेगुसराय जिल्ह्याच्या भगवानपूर गटातील महेश पूर वॉर्ड 5 येथे राहतात. सुरुवातीला त्या काम करायच्या परंतु त्यानंतर त्यांनी काम सोडून देसी कोंबडींच्या व्यवसाय करण्याला सुरुवात केली.
यावेळी संगीता देवी यांनी सांगितले की, जीविकाच्या आयपीडीएस थर्ड या योजनेअंतर्गत त्यांनी 450 रुपये खर्च करून 25 कोंबड्या विकत घेतल्या होत्या. आणि त्यांचे पालनपोषण त्यांनीं केले. त्यांच्याकडे कोंबड्यांच्या अनेक जाती होत्या. या त्यांच्याकडे कडकनाथ, सोनाली, एफएफजी इत्यादी प्रजातीचे कोंबडे आणि कोंबड्या आहेत.
कोंबड्यांच्या अंड्याने देखील होतो नफा | Bussiness Idea Of Poultry Farm
या कोंबड्यांचे मटन त्या बाजारात विकतात त्याचप्रमाणे कोंबड्यांपासून त्यांना अंडी देखील होतात. त्याचप्रमाणे त्यांचे पिल्ले देखील होतात. ही पिल्लं झाल्यामुळे त्यांचा व्यवसाय त्यांना पुढे नेता येतो. त्याचप्रमाणे त्या अंडी विकून देखील नफा कमवत असतात.
यावेळी गणेश कुमार यांनी देखील सांगितले की, जीविकाशी निगडित डॉक्टर त्यांना त्यांच्या कोंबड्यांचे संगोपन करण्यासाठी दवाखर्चाची मदत करत असतात. त्यामुळे कोंबड्यांना काही झाले तरी त्यांच्यावर योग्य उपचार मिळतात.
कुक्कुटपालनापासून होणार नफा
संगीता देवी या गेल्या एक वर्षापासून या कोंबड्यांचे पालन करत आहे त्यांनी सांगितले की, त्यांनी सुरुवातीला 25 कोंबड्यांपासून या व्यवसायाला सुरुवात केली आणि आज त्यांच्याकडे बघता बघता 100 कोंबड्या झालेल्या आहेत. या गावरान कोंबड्यांच्या अंड्याची किंमत बाजारात 20 रुपये एवढी आहे. त्या दररोज जवळपास 200 रुपये किमतीची अंडी विकतात. त्याचप्रमाणे चार ते पाच किलो कोंबड्यांचे मटण देखील विकतात. अशा प्रकारे त्यांना रोजचा 2 हजार ते अडीच हजार रुपयांपर्यंतचा उत्पन्न मिळते.
त्यामुळे तुम्ही देखील जर शेतीला अनुसरून एखादा व्यवसाय करण्याचा विचार करत असाल, तर कुक्कुटपालन (Bussiness Idea Of Poultry Farm) हा व्यवसाय तुमच्यासाठी अत्यंत चांगला व्यवसाय ठरू शकतो. कारण यामध्ये जास्त कष्ट न लागता तुम्ही भरघोस उत्पन्न घेऊ शकता.