Bussiness Idea | भारतात अनेक ई कॉमर्स कंपन्या आहेत. ॲमेझॉन, फ्लिपकार्ट या भारतातील आघाडीच्या कंपन्या आहेत. या कंपन्यांच्या माध्यमातून विविध प्रकारच्या गोष्टींची डिलिव्हरी अत्यंत वेगाने लोकांना घरपोच होत असते. सध्या या दोन कंपन्या ई-कॉमर्स मार्केटमधील सगळ्यात वेगाने चालणाऱ्या कंपन्या आहेत. कोरोनानंतर ऑनलाईन शॉपिंगचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. आणि याचाच फायदा ई-कॉमर्स कंपन्यांना झालेला दिसत आहे. अनेक लोकांना बाहेर पडून शॉपिंग करण्यासाठी वेळ नसतो. त्यामुळे लोक ऑनलाईन गोष्टी ऑर्डर करत असतात. परंतु यामुळे आता याचा फायदा ई-कॉमर्स साईटला मोठा प्रमाणात होत आहे. यामध्ये फ्लिपकार्ट ही अत्यंत लोकप्रिय अशी कंपनी आहे. या ठिकाणी दररोज लाखोंच्या संख्येने ऑर्डर दिल्या जातात. आणि त्या पूर्ण देखील होतात.
अशातच आता तुम्ही जर flipkart सोबत फ्लिपकार्ट डिलिव्हरीचा फ्रेंचाईजी घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरू केला, तर यातून तुम्हाला खूप चांगला व्यवसाय करता येईल. आणि तुम्हाला नफा देखील होईल. ही फ्रेंचाईची घेतल्यानंतर तुम्हाला ग्राहकांपर्यंत ऑर्डर पोचवण्याचे काम करायचे आहे. जर तुम्ही देखील व्यवसाय करण्याचा विचार करत असाल, तर फ्लिपकार्ट डिलिव्हरीचे मॉडेल हे तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरू शकते. यामध्ये अनेक प्रकार असतात.
घेतल्यानंतर तुम्हाला ग्राहकांच्या माध्यमातून ऑर्डर घेतल्या जातील. आणि तो माल ग्राहकांपर्यंत घरी देखील पोहोचवला जाईल. पिकअप स्टोअर, flipkart पिकअप पॉईंटच्या स्वरूपात घेऊ शकता. या पद्धतीने जर तुम्ही व्यवसाय केला तर त्यातून तुम्हाला खूप कमी कालावधीमध्ये चांगला व्यवसाय करता येईल. आता फ्लिपकार्ट डिलिव्हरी फ्रेंचायसी घेण्यासाठी काय पात्रता असावी लागते? यासाठी किती खर्च येतो ? आणि तुम्ही किती नफा कमावू शकता? याची माहिती जाणून घेऊया.
फ्लिपकार्ट डिलिव्हरी फ्रेंचाईजीसाठी पात्रता ? | Bussiness Idea
- तुम्हाला जर flipkart डिलिव्हरी फ्रेंचायसी घ्यायची असेल तर त्यासाठी तुम्हाला आधीच लॉजिस्टिकचा अनुभव असणे गरजेचे आहे. म्हणजे तुम्ही लॉजिस्टिक कंपनीमध्ये काम करून अनुभव घेतला असेल तर तुम्ही यासाठी पात्र आहात.
- फ्लिपकार्टची डिलिव्हरी फ्रेंचायसी घेण्यासाठी तुमच्याकडे काही सुरक्षा रक्कम असणे गरजेचे आहे.
- फ्लिपकार्टच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या ग्राहकांना 24× 7 सेवा द्यावी लागेल. म्हणजेच तुम्हाला 24 तास उपलब्ध असावे लागेल.
- फ्लिपकार्ट हा एक खूप मोठा ब्रँड आहे. त्यामुळे या ब्रँडशी एकनिष्ठ राहून तुम्हाला हा व्यवसाय करावा लागेल.
- तसेच तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स खूप गरजेचे आहे. यासाठी तुमच्याकडे 500 ते 1500 स्क्वेअर फुट जागा असावी. त्या ठिकाणी तुम्ही ही फ्रेंच जीव देऊ शकता. .
फ्लिपकार्ट डिलिव्हरी फ्रेंचाईजी घेण्यासाठी किती खर्च येतो?
- तुम्हाला जर फ्लिपकार्ट डिलिव्हरी फ्रेंचायजी घ्यायची असेल तर यासाठी तुम्हाला जवळपास 50 हजार रुपये ते 3 लाख रुपयेपर्यंत खर्च येऊ शकतो.
- ही फ्रेंच आईची घेण्यासाठी तुम्हाला सुरुवातीला 5 हजार रुपयांचे सुरक्षा शुल्क म्हणजे डिपॉझिट देखील जमा करावे लागते.
- तसेच या व्यवसायासाठी ऑफिसचा सेटअप करण्यासाठी तुम्हाला फर्निचर तसेच डिलिव्हरी पिकअपसाठी बाईक असणे गरजेचे आहे. तसेच पाच ते दहा कर्मचाऱ्यांचा स्टाफ तुमच्याकडे असावा.
फ्लिपकार्ट डिलिव्हरी फ्रेंचायसी मधून किती पैसे कमवता येईल ?
तुम्ही फ्लिपकार्टची डिलिव्हरी फ्रेंचाईची घेतली, तर तुमच्या स्थानानुसार तुम्ही दरवर्षाला 5 लाख ते 15 लाख रुपयांची कमाई करू शकता.
अर्ज कसा करावा ? | Bussiness Idea
तुम्हाला फ्लिपकार्ट डिलिव्हरी त्यांच्यासाठी अर्ज करण्यासाठी तुमच्या शहराच्या प्रादेशिक ई-कार्ड समर्थनशी संपर्क साधावा लागेल. किंवा flipkart च्या प्रादेशिक कार्यालयात जाऊन देखील तुम्ही आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करू शकता.